सांगोला तालुक्यातील खळबळजनक घटना! पशुपालकाच्या घराला बाहेरून
कडी घालत नऊ शेळ्या, ३ बोकडं पळवली; शेतकऱ्यांमध्ये भीतीदायक वातावरण
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
पशुपालकाच्या घराला बाहेरून कडी घालून गोठ्यात बांधलेल्या ९ शेळ्या अन् ३ बोकडे चोरी करून चोरट्याने धूम ठोकली. सोमवारी मध्यरात्री ही चोरी झाली.
बालाजी भगवान गोडसे (रा.गोडसेवाडी, ता. सांगोला) यांनी फिर्याद दिली आहे. बालाजी गोडसे यांनी शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालन व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्याकडे असणाऱ्या शेळ्या व बोकड त्यांच्या घरासमोर तारेची जाळी मारून कुंपणात बंदिस्त करून ठेवल्या होत्या.
रविवार १० नोव्हेंबर रोजी रात्री १०:३०च्या सुमारास गोडसे कुटुंबातील सदस्य जेवण आटोपून झोपी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास गोडसे हे लघुशंकेसाठी बाहेर आले असता त्यांना गोठ्यात शेळ्या व बोकडं दिसली. त्यानंतर त्यानंतर पुन्हा ते घरात जाऊन झोपले.
चोरट्याने हीच संधी साधून शेळ्या आणि बोकडं पळवली. फिर्यादी दुसऱ्या दिवशी सोमवारी पहाटे ५ च्या सुमारास घराचा दरवाजा उघडण्यासाठी गेले असता तो उघडला नाही.
म्हणून त्यांनी शेजारी राहणारे भगवान गोडसे यांना फोन करून घराच्या दरवाजाला लावलेली कडी काढण्यास सांगितले.
0 Comments