निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाया; चोख बंदोबस्त.कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही :-
पोलीस निरीक्षक. भिमराव खणदाळे
२५३ सांगोला विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने सांगोला पोलीस ठाणेकडून करण्यात आलेली प्रतिबंधक कारवाई आणि बंदोबस्त नियोजना संदर्भातील नियोजन केले असून दि. २०/११/२०२४ रोजी २५३ सांगोला विधानसभा निवडणुक मतदान प्रक्रिया होणार आहे.
सदर निवडणुकीची पुर्व तयारी बरेच दिवसापासुन चालु असून उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड मंगळवेढा विभाग यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे सांगोला पोलीस ठाणे तसेच सांगोला पोलीस ठाणेकडील अधिकारी आणि अंमलदार यांनी पोलीस ठाणेहद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर खालीलप्रमाणे प्रतिबंधक कारवाई केली आहे.
भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १२६ प्रमाणे ६६६ जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १२९ प्रमाणे १४ जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे
वारंवार दारु विक्री करणारे इसमांच्या विरोधात प्रोव्ही. कायदा कलम ९३ प्रमाणे २३ इसमांच्या विरोधात प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत. जे गुन्हेगार टोळीने गुन्हे करतात अशा एका टोळीतील दोन सदस्यांविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ प्रमाणे दोन
वर्षाकरीता जिल्हयातुन हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. जे गुन्हेगार रेकॉर्डवरील आहेत आणि ज्यांच्या विरोधात तकार देण्यास लोक धजावत नाहीत व धोकादायक आहेत
अशा ५ इसमांच्या विरोधात दोन वर्षाकरीता जिल्हयातुन हद्दपार करण्यात यावे याकरीता महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ ब प्रमाणे प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत. धोकादायक व रेकॉर्डवरील असलेले दोन गुन्हेगारांना येरवडा कारागृह
येथे १ वर्षाकरीता स्थानबध्द करण्यासंदर्भात एमपीडीए प्रमाणे दोन प्रस्ताव सादर पाठविण्यात आलेले आहेत निवडणुक कालावधीत निवडणुक निर्भयपणे व शांततेत पार पडावी याकरीता रेकॉर्डवरील आणि मागील निवडणुकी दरम्यान गुन्हे करणारे २९ लोकांवर
भारतीय नागरीकसुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (२) प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई ही विधानसभा निवडणुक २०२४ ही निर्भयपणे व भयमुक्त वातावरणात पार पडावी याकरीता करण्यात आलेले आहेत.
निवडणुक कालावधीत गुन्हे करणारे इसमांवर पोलीसांची निगरानीकरीता विशेष पथक नेमण्यात आलेले आहे. लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये बागलवाडी ता. सांगोला गावातील मतदान केंद्रावर बेकायदेशीरपणे
इव्हीएम मशीन जाळून नुकसान करणाऱ्या आरोपीचा अद्याप पर्यंत जामीन झालेला नाही. त्यामुळे निवडणुक संदर्भात कोणीही कायदा हातात घेवु नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने केलेले आहे.
सांगोला २५३ विधानसभा निवडणुक २०२४ शांततेत व निर्विघ्नपणे पार पडणेकरीता पोलीस दलाकडुन खालीलप्रमाणे बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे.
सीआयएसएफ हैद्राबाद कडील ९० सशस्त्र अधिकारी कर्मचारी, आयटीबीपी कडील १ प्लॅटन ४० सशस्त्र कर्मचारी, एसआरपीएफ ग्रुप १०४० सशस्त्र कर्मचारी,
एसआरपीएफ ग्रुप १० सोलापुर कडील ४० सशस्त्र अधिकारी-कर्मचारी, मंदिर समिती पंढरपूर कडील ३० पोलीस अंमलदार, सोलापुर शहर कडील २० पोलीस अंमलदार, सोलापुर ग्रामीण पोलीस मुख्यालयाकडील २२ पोलीस अंमलदार,
कर्नाटक राज्यातील २०० होमगार्ड, १४५ नव प्रविष्ठ पोलीस शिपाई व सोलापुर प्रशिक्षण केंद्र येथुन सांगोला येथे आलेले असुन सांगोला पोलीस ठाणेकडील अधिकारी अंमलदार यांच्यासह सुमारे ५०० अंमलदार अधिकारी यांना सदर
बंदोबस्तासंदर्भात सुचना, साहित्य व बंदोबस्ताचे वाटप हर्षदा लॉन्स सांगोला येथे उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा विभाग विक्रांत गायकवाड यांनी केले असल्याची माहिती सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे यांनी दिली आहे.
0 Comments