सांगोला विधानसभा मतदारसंघात एकूण १हजार २८१ पोस्टल मतदान.
सांगोला प्रतिनिधी - २५३ सांगोला विधानसभा मतदारसंघात तहसील कार्यालयात दिनांक १२/११ ते १८/११/२४ रोजी पर्यत एकूण १ हजार २८१ मतदान पूर्ण झाल्याचे आहे त्यामध्ये सांगोला ९७५,
जिल्ह्यातील २०० व जिल्हा बाहेरील १०६ मतदान झाले आहे या पोस्टल मतदानाची प्रक्रिया दि.१२/११/२४ पासुन सांगोला तहसील कार्यालयात सुरू झालेली होती.
पोस्टल मतदान करण्यासाठी तहसील कार्यालय येथे पोस्टल मतदान साक्षांकन करण्यासाठी राजपत्रित अधिकारी वसंत फुले सहाय्यक
गटविकास अधिकारी व प्रकाश नालवार उपनिबंधक यांची नेमणूक केली आहे तसेच मतदान केंद्राध्यक्ष संतोष लोंढे व सुभाष रोकडे तसेच मतदान अधिकारी उत्तम नवले यांची नियुक्ती केले
असून त्या ठिकाणी २५३ विधानसभासाठी १ व जिल्हा अंतर्गत विधानसभासाठी १ व जिल्हा बाहेरील विधानसभा साठी १ मत मतपेटी ठेवलेल्या आहेत
या ठिकाणी आज एकूण १ हजार २८१ मतदारांनी मतदान केले असल्याची माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी दिली आहे
0 Comments