google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक! बाजारात धक्का लागल्याच्या कारणाने चाकूने भोसकून कामगाराचा खून; पोलिसात गुन्हा दाखल सांगोला तालुक्यातील घटना..

Breaking News

धक्कादायक! बाजारात धक्का लागल्याच्या कारणाने चाकूने भोसकून कामगाराचा खून; पोलिसात गुन्हा दाखल सांगोला तालुक्यातील घटना..

धक्कादायक! बाजारात धक्का लागल्याच्या कारणाने चाकूने भोसकून कामगाराचा खून; पोलिसात गुन्हा दाखल सांगोला तालुक्यातील घटना..


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

पायी चालत जाताना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून एकाने चिडून चाकूने पाठीत भोसकून ५० वर्षीय मजूर कामगाराचा खून केला

 व घटनास्थळावरून धूम ठोकली होती.मात्र, पोलिसांनी त्यास अवघ्या एक तासातच जुनोनी रोडवरून पकडून ताब्यात घेतले.

ही घटना शनिवारी रात्री सांगोला) येथील करगणी रोडवर घडली. पोपट भगवान आलदर (वय ५०, रा. संत तुकारामनगर, कोळे, ता. सांगोला) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.

याबाबत, विशाल पोपट आलदर यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी प्रकाश दत्तू आलदर (रा. कोळा, ता. सांगोला) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३-कलम १०३ (१), ३५२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला.

दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली. पोलिसांनी आरोपीस अटक केली

 असून रविवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी सांगितले.

फिर्यादी, विशाल आलदर याचे वडील मयत पोपट आलदर हे शनिवारी दुपारी ४:३० च्या सुमारास मुकादम दाजी आलदर यांच्याकडे पगाराचे पैसे आणण्यासाठी कोळा गावात गेले होते.

मात्र, मुकादमाने त्यांचा पगार न केल्यामुळे त्यांना घराकडे परतण्यास उशीर झाला होता. म्हणून मुलगा विशालने वडिलांच्या फोनवर फोन लावला असता तो स्वीच ऑफ लागला.

दरम्यान, शनिवारी रात्री ८:३० वाजता वाटेत कोळा करगणी रोडवरील पोलिस पाटील यांच्या घराजवळ संगम चायनीज समोरून पोपट आलदर हे पायी चालत जात असताना

 आरोपी प्रकाश आलदर यास धक्का लागल्याचे किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून आरोपीने चिडून पोपट आलदर यांच्या पाठीत चाकूने भोसकल्याने ते गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले होते.

या घटनेची माहिती गणेश सरगर यांनी त्यांचा मुलगा विशाल यास दिली. त्यानंतर फिर्यादी व त्याची आईने कोळे गावात येऊन या घटनेची माहिती ज्ञानेश्वर गोरड (कोळा) यांना देऊन पोलिसांनाही कळविले.

नातेवाइकांनी पोपट आलदर यांना गंभीर अवस्थेत रुग्णवाहिकेतून सांगोला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून ते उपचारापूर्वी मदत झाल्याचे सांगितले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पवनकुमार मोरे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments