google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..सागोला, सोलापूर, महाराष्ट्र आदर्श आचारसंहिता लागू असतानाही सांगोला तालुक्यात अवैध धंद्यांचा उत. अवैध वहातुक, चंदन, मटका, वाळू जुगार, दारू, पेट्रोल, गुटख्याची विक्री जामात सुरू.; या अवैध धंद्यांना लगाम कोण लावणार ?

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..सागोला, सोलापूर, महाराष्ट्र आदर्श आचारसंहिता लागू असतानाही सांगोला तालुक्यात अवैध धंद्यांचा उत. अवैध वहातुक, चंदन, मटका, वाळू जुगार, दारू, पेट्रोल, गुटख्याची विक्री जामात सुरू.; या अवैध धंद्यांना लगाम कोण लावणार ?

ब्रेकिंग न्यूज..सागोला, सोलापूर, महाराष्ट्र आदर्श आचारसंहिता लागू असतानाही सांगोला तालुक्यात अवैध धंद्यांचा उत.


अवैध वहातुक, चंदन, मटका, वाळू जुगार, दारू, पेट्रोल, गुटख्याची विक्री जामात सुरू.; या अवैध धंद्यांना लगाम कोण लावणार ?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ची आचारसंहिता सुरु झाली असताना ही सांगोला तालुक्यात अवैध धंद्यांना उत आल्याचे चित्र दिसून येत आहे. 

शहरासह गावागावात खुलेआम अवैध वहातुक, दारू, पेट्रोल, मटका, जुगार, गुटख्याची विक्री राजरोसपणे होत आहे. तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर असणाऱ्या हॉटेल, ढाब्यांतूनही बेकायदेशीरपणे 

दारूची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिसांसह सर्वच प्रशासकीय यंत्रणेचे या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस अवैध धंदे फोफावत असल्याचे दिसून येत आहे.

 बेकायदा दारू विक्रीबरोबरच तालुक्यात गुटखा, पेट्रोलचीही बेकायदेशीरपणे विक्री अनेक ठिकाणी होत आहे. अनेक गावांत काही पानटपऱ्या, टेलरिंग दुकान, किराणा दुकानांतून पेट्रोल, गुटख्याची खुलेआमपणे विक्री केली जात आहे. बेकायदेशीरपणे होणाऱ्या दारू, पेट्रोल आणि 

गुटख्याच्या विक्रीचे दरही बेकायदेशीर आहेत. दीडपट ते दुप्पट दराने याची खुलेआमपणे विक्री होत आहे. तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर बेकायदेशीर धंदे खुलेआमपणे सुरु असतानाही कारवाई झाल्याचे चित्र कोठेचे दिसून येत नाही.

 संबंधित गावची जबाबदारी असणाऱ्या पोलीस, बीट अंमलदारांना, बेकायदा धंद्यांची माहिती असूनदेखील सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. पोलिस विभागाचे सोयीस्कर या अवैध व्यावसायाकडे दुर्लक्ष होत

 असल्याने तालुक्यातील अवैद्य धंद्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा धंदेवाल्यांवर कोणाचीच जरब नसल्याने चित्र आहे. काही पोलिसांची चिरमिरीची वृत्तीच याला कारणीभूत असल्याची चर्चा असून, 

काही पोलिस कर्मचारी या अवैध विक्रेत्याकडून वरकमाईत गुंतलेले दिसतात. एखाद्या महिन्याला एखाद्याची सांगोला वारी चुकली, तर दुसऱ्या महिन्यात दोन हजार रुपये द्यावे लागत असल्याची चर्चा आहे.

 एकूणच या साऱ्या प्रकारामुळे शहरासह तालुक्यात अवैध व्यवसाय जोमात सुरु असल्याचे दिसत आहे. यामुळे गुन्हेगारीतही मोठी वाढ झाली आहे. याला लगाम घातला जावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.

श्री. उमेश मंडले

तालुक्यात बेकायदा दारू विक्री होणाऱ्या ढाब्यांवर दौऱ्याच्या निमित्ताने काही 'खाकी' वर्दीवाल्यांची वर्दळ असते. त्यावेळी या ठिकाणी खाण्या-पिण्याचा कार्यक्रमही रंगलेला असतो.

 अनेकदा त्यासाठी स्पॉन्सर असतो. किंबहुना ढाबेवाल्यांकडूनच खूश केले जात असल्याचे चित्र दिसून येत असून, खाकीच्या अशा वागणुकीची नागरिकांत खुलेआम चर्चा सुरु आहे.

Post a Comment

0 Comments