मोठी बातमी..माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा
लोक भावनेचा आदर करून सांगोला विधानसभा निवडणूक लढविण्याचा दिपकआबांचा निर्धार
सांगोला ; तालुका प्रतिनिधी राज्यात विधानसभा निवडणूक जवळ येत असताना राजकीय वर्तुळातून दररोज धक्कादायक घटना घडत असताना महायुतीला सोलापूर जिल्ह्यात जोरदार झटका बसला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि विधानपरिषदेचे माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे.
त्याचबरोबर सांगोला तालुक्यातील लोक भावनेचा आदर करून आपण सांगोला विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
मंगळवार दि १५ रोजी सांगोला येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मधुकर बनसोडे शहर अध्यक्ष तानाजी काका पाटील
यांच्यासह पियुषदादा साळुंखे पाटील, यशराजे साळुंखे पाटील, सुनीलकाका गायकवाड, सरपंच शहाजी हातेकर, शिवाजीनाना बनकर, शिवाजीराव कोळेकर, रवींद्र कदम, बाळदादा सराटे, ,
सिध्देश्वर उर्फ नाथा जाधव, विश्वनाथ चव्हाण, विजयदादा येलपले, डॉ.धनजंय पवार, विनायक मिसाळ, चंद्रकांत करांडे, राम बाबर, अनिलनाना खटकाळे, नंदकुमार दिघे, अजित गोडसे, जुबेर मुजावर, अमोल सुरवसे,
सोमनाथ लोखंडे, सखुताई वाघमारे, सुचीतकाकी मस्के, संतोष पाटील, सूर्याजी खटकाळे, डॉ.राज मिसाळ, शिवाजीराव जावीर, महादेव कांबळे, चंद्रकांत शिंदे, विजय राऊत, सदाशिवतात्या साळुंखे, मधुकर बनसोडे, विनोद रणदिवे, सतीश काशीद,
विजय पवार, राजू गोडसे, भारत साळुंखे, हरिहर, ज्ञानेश्वर शिंदे, सचिन पाटणे, अमर लोखंडे, सागर मिसाळ, शहाजी खरात, पै.हरी सरगर, आलमगीर मुल्ला, चंचल बनसोडे, दिलीप मस्के आदींसह पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना दिपकआबा म्हणाले, स्व आमदार काकासाहेब साळुंखे पाटील आणि स्व शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या संस्कारानुसर गेली ३० ते ३५ वर्षे राजकीय जीवनात सक्रिय आहे.
देशाचे नेते शरदचंद्र पवार आणि राज्याचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण राजकारणात सक्रिय झालो.
पवार घराण्याशी निष्ठा राखत त्यांनी दिलेला आदेश शिरसांवद्य मानून सुरुवातीला २० ते २५ वर्षे स्व माजी आमदार गणपतराव देशमुख यांना प्रामाणिकपणे मदत केली आणि त्यांना आमदारकीचा विश्वविक्रम करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली.
स्व गणपतराव देशमुख यांनी त्यांच्यानंतर एकवेळ आपल्याला संधी देऊ असे आश्वासन दिले होते मात्र २०१९ ला त्यांनी ऐनवेळी आपल्या नातवाचे नाव
पुढे केल्याने सर्व समर्थकांना विश्वासात घेऊन त्यांच्या मतानुसार शहाजीबापू पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेली २५ ते ३० वर्षे आपण स्व गणपतराव देशमुख आणि विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील या दोघांनाही
आमदार कण्यात सिंहाचा वाटा उचलला. मात्र गेली वर्षभरापासून माझे सांगोला विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागात ज्या वेळी दौरे होतात त्यावेळी गावखेड्यातील सामान्य माणूस महिला आणि तरुण मंडळी यंदा पक्ष कोणताही
असो तुम्हीच निवडणूक लढवावी असा आग्रह धरत आहेत. आणि त्यांनीच माझी उमेदवारी जाहीर करून ही निवडणूक जनतेच्या हातात घेतल्याने लोकभावनेचा आदर करून आणि नैतिकतेला धरून मी यंदाची निवडणूक काही झाले
तरी लढवायचीच असा निर्धार केला आहे. निवडणुकीला सामोरे जाणार असल्याने मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष आणि सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे शेवटी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी नमूद केले.
चौकट ;
१) कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच पुढील भूमिका ठरवणार
गेली ३० ते ३५ वर्षे राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करत असताना आई वडिलांचे संस्कार आणि सर्वसामान्य कार्यकर्ता तसेच
त्याचा आपल्यावर असलेला विश्वास हेच आपले राजकीय भांडवल म्हणून काम करत आलो आहे. माझे जे काही राजकीय आणि सामाजिक अस्तित्व आहे
ते याच बहाद्दर कार्यकर्त्यांच्या बळावर असल्याने पुढील राजकीय भूमिका सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच ठरवणार आहे पक्ष चिन्ह याबाबत आत्ताच काही बोलू शकत नाही मात्र मी येणारी विधानसभेची निवडणूक लढविणारच..!
दिपकआबा साळुंखे पाटील,
माजी आमदार
२) देशमुख बंधू आणि शहाजीबापूंनी केलेल्या मदतीची जाणीव ठेवून पाठिंबा द्यावा..!
स्व गणपतराव देशमुख यांना ४ ते ५ निवडणुकीत आपण प्रामाणिकपणे मदत केली त्याबदल्यात त्यांनी आपल्याला संधी देण्याचा शब्द दिला होता. आपल्या आजोबांनी दिलेला शब्द
त्यांच्या डॉ अनिकेत देशमुख आणि डॉ बाबासाहेब देशमुख या दोन्ही नातुंनी पूर्ण करावा तसेच अनेक वर्षांची पराभवाची मालिका खंडित करून २०१९ ला विजयाचा गुलाल उधळण्याची संधी दिली
त्याबद्दल शहाजीबापूंनीही मनाचा मोठेपणा दाखवून आपल्याला मदत करावी अशी भावनिक सादही यावेळी दिपकआबा साळुंखे पाटील यांनी डॉ देशमुख बंधू तसेच शहाजी बापूंना घातली आहे.
0 Comments