सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी रविराज शेटे तर सचिव पदी दत्तात्रय पवार यांची निवड.
सांगोला प्रतिनिधी- सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेची बैठक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश भाऊ सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यामध्ये अध्यक्षपदी रविराज शेटे तर सचिव पदी दत्तात्रय पवार यांची निवड करण्यात आली आहे. सदर प्रसंगी उपाध्यक्ष सचिन धांडोरे, दशरथ बाबर व बबनराव चव्हाण यांची तर खजिनदारपदी विशाल मोरे ,
तर सहसचिव पदी राजू होवाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात. आली . तर सदस्य म्हणून नानासो हालगंडे, निखिल काटे, संतोष बनसोडे, अतुल फसाले, जगदीश कुलकर्णी, आण्णासाहेब खरात, समाधान धांडोरे, देवदत्त धांडोरे,
रंजीत महापुरे, विकास जावीर, वैभव काटे यांचे एकमताने निवड करण्यात आली . निवडीनंतर सर्वांचा सत्कार करण्यात आला. सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागातील पत्रकारिता प्रथमच ग्रामीण पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात आली आहे
या संघटनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार आहे तरी सर्वांनी सहकार्य करावे असे मत नूतन अध्यक्ष रविराज शेटे यांनी व्यक्त केले. यावेळी विनोद चंदनशिवे, दीपक धुकटे, सचिन कुंभार, महेश धांडोरे उपस्थित होते.
0 Comments