धक्कादायक बातमी ! घरासमोर खेळत असलेल्या गतिमंद मुलीला उचलून नेत केला बलात्कार ;
शारीरिक संबंधाचे चित्रीकरणही केले, संतापजनक घटनेने महाराष्ट्र पुन्हा हादरला
विद्येचे माहेरघर म्हणून संपूर्ण देशाला परिचित असणाऱ्या असणाऱ्या पुण्यातून एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे.
घरासमोर खेळत असलेल्या गतीमंद मुलीला उचलून नेत तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार नुकताच घडला आहे.
आरोपीने गतिमंद मुलीला चॉकलेट खाण्यासाठी पैसे देण्याचे आमिष दाखवत बलात्कार केला आहे.
या घटनेने पुणे शहरात शहरात मोठी खळबळ उडाली आहे. हा सर्व प्रकार पुण्यातील हडपसरमध्ये घडला आहे.
याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राजनाथ (वय-३७) नावाच्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२)
(आय) (के) (एम), ६५ (१), ३५१ (२) सह कलम ४, ५ (के) (एल), ८, १२, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलंय?
पिडीत मुलगी ही गतीमंद आहे. ती घरासमोर खेळत असताना आरोपीने तिला खाऊसाठी पैसे देतो असे सांगत उचलून सोसायटी मधील
एका निर्जनस्थळी नेले. त्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे शारीरिक संबंधांचे व्हिडिओ चित्रीकरण
करून याबाबत कोणाला काही सांगितल्यास बघून घेण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. हडपसर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास हडपसर पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे.
0 Comments