धक्कादायक..सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथे शॉर्टसर्किटमुळे एक एकर ऊस जळून खाक.
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला / तालुका प्रतिनिधी उसाच्या शेतातून गेलेल्या वीजेच्या तारा मध्ये शार्टसर्किट होवून लागलेल्या भीषण आगीत ४० आर क्षेत्रातील संपूर्ण उस पिकांसह ठिबक साहित्य
जळून शेत मालकाचे सुमारे २ लाख ३५ हजार रुपयाचे नुकसान झाले.ही घटना नुकतीच वाकी शिवणे ता सांगोला येथील बाबर मळा येथे घडली. याबाबत , प्रवीण बाबर यांनी खबर दिली आहे.
वाकी शिवणे (बाबरमळा ) येथील प्रविण बाबर यांच्या शेती गट नंबर -२१०/३ मध्ये वडील भोजलिंग श्रीमंत बाबर व सचिन भुसे यांच्या नावावर असलेल्या ४० आर शेतामध्ये उसाच्या पिकाची लागवड केली आहे
दरम्यान ४ ऑक्टोंबर रोजी दुपारी ४ च्या सुमारास प्रवीण बाबर घरी असताना भाऊ अनिल बाबर याने त्यास फोन करुन आपल्या उसाच्या रानात आग लागली आहे
जावून बघ असे म्हणाल्यावर खबरी प्रवीण बाबर व शेजारच्या लोकांनी शेतात जाऊन पाहिले असता उसाच्या पूर्ण क्षेत्रामध्ये आग पसरलेली होती उपस्थित
जमलेल्या लोकांनी मोटार चालू करून उसामध्ये पाणी भरून आग विझविण्याचा प्रयत्न केला
परंतु आगीमध्ये ४० आर ऊस पूर्ण जळून गेला व उसाच्या क्षेत्रामध्ये १६ एम एम १० ड्रीप बंडल, अडीच इंच १० पाईप, २ इंच १० पीव्हीसी पाईप, ठिबक साठी पसरले होते
सदर आगी मध्ये २ लाख १० हजार रुपये किमतीचे ११ महिने महिन्याचे उसाचे पीक १०० टक्के जळून तसेच ठिबक साहित्य जळून अंदाजे २५ हजार रुपये असे सुमारे २ लाख ३५ हजार रुपयाचे नुकसान झाले.
सदर उसाच्या क्षेत्रातून रेहमान मुलाणी यांच्या लाईटची केबल गेलेली असून , एम एस ई बी च्या ताराही गेल्यामुळे कोणाच्या चुकीमुळे लागली
हे समजून येत नसल्याचे खबरी जबाबात नोंद असल्याची माहिती सांगोला पोलीस ठाण्याकडून मिळाली आहे.
0 Comments