google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 फटाक्यांवरील चित्रांद्वारे होणारी हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना थांबवा तसेच मिठाई मध्ये होणारी भेसळ रोखा सांगोला येथे हिंदू जनजागृती समितीची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

Breaking News

फटाक्यांवरील चित्रांद्वारे होणारी हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना थांबवा तसेच मिठाई मध्ये होणारी भेसळ रोखा सांगोला येथे हिंदू जनजागृती समितीची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

फटाक्यांवरील चित्रांद्वारे होणारी हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना थांबवा तसेच मिठाई मध्ये होणारी



भेसळ रोखा सांगोला येथे हिंदू जनजागृती समितीची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी 

सांगोला - फटाक्यांवरील चित्रांद्वारे होणारी हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखावी आणि अवैधपणे विक्री होत असलेल्या चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घालावी, तसेच मिठाईमध्ये होणारी भेसळ रोखावी या मागणी चे निवेदन शुक्रवार, 25 ऑक्टोंबर या दिवशी

सांगोला येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदार आणि पोलीस यांना देण्यात आले. तहसीलदार संतोष कणसे आणि पोलीस निरीक्षक यांच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक रूपाली उबाळे यांनी निवेदन स्वीकारले.

 यावेळी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने गणपत पटेल, कैलास राणावत, अजय तेली, डॉक्टर मानस कमलापूरकर, श्रीकांत चव्हाण, निलेश कांबळे, ओंकार मिसाळ,  सचिन गायकवाड, संतोष पाटणे सर, विकास गावडे, मयुरेश गुरव उपस्थित होते. 

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, फटाक्यांच्या वेष्ठनांवर हिंदू देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे छापली जातात त्यामुळे आज देवतांची विटंबना आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान सर्रास होताना पाहायला मिळत आहे. 

ही विटंबना थांबवण्यासाठी हिंदू जनजागृती समिती वर्ष 2005 पासून वैद्य मार्गाने जनजागृती चळवळ राबवत आहे. या चळवळीच्या अंतर्गत श्रीलक्ष्मी श्रीकृष्ण श्रीविष्णु आदी हिंदू देवतांची विटंबना रोखावी

 तसेच नेताजी सुभाष चंद्र बोस, लोकमान्य टिळक आदी राष्ट्र पुरुषांचा अवमान रोखावा, यासाठी शासनाकडे वारंवार मागणी करत आहोत. अशा फटाक्यांची निर्मिती आणि विक्री शासनाने थांबवावी

 अशी मागणी करूनही शासनाकडून मर्यादित पत्र व्यवहाराच्या व्यतिरिक्त कोणतीही ठोस  कारवाई होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आजही शासनाने परिपत्रक काढूनहीं  देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले

 फटाके मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. हे फटाके फोडल्यावर त्यावरील देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या चित्राच्या चिंधड्या होऊन त्या जागोजागी पडलेल्या आढळतात या चिंधड्या अनेकांच्या पायाखाली, केरात,

 चिखलात गटारात पडलेल्या निदर्शनास येतात. त्यामुळे देवतांची विटंबना आणि राष्ट्रपुरुषांचा अनुमान होऊन कोट्यावधी हिंदूंच्या धावधानिक भावना दुखावत आहेत तसेच राष्ट्रीय अस्मितांवर आघात होत आहेत.

काही ठिकाणी समितीच्या कार्यकर्त्यांनी याविषयी पोलिसात तक्रार करून अशी फटाक्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यास भाग पाडले आहे प्रत्यक्षात समितीच्या वतीने प्रतिवर्षी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन इत्यादींना निवेदन देऊनही असे गंभीर प्रकार चालू आहेत, हे दुर्दैव आहे. 

देवतांची विटंबना झाल्यामुळे,'धार्मिक भावना दुखावणे' हा भा.द.वि. कलम 295,(अ) नुसार अजामीनपात्र आणि दंडनीय अपराध आहे तसेच केंद्र शासनाच्या

 ,'व्यापारी चिन्ह कायदा 1999' मधील कलम 9(2)( बी) नुसार व्यापारी उत्पादनांवर 'धार्मिक चिन्ह व चित्र' छापणे हाही गुन्हा आहे. भारताच्या राज्यघटनेच्या कलम 25 नुसार प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्य असून त्याचे रक्षण करणे हे शासनाचे कर्तव्य आहे 

देवता आणि राष्ट्रपुरुषांचे चित्र असलेल्या फटाक्यांची निर्मिती आणि विक्री कायमची बंद व्हावी, यासाठी कठोर कारवाई करावी तसेच शासन करत असलेले कारवाई विषयी आम्हालाही अवगत करावे ही विनंती 

 प्रशासनाने चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घालावी* भारतात फोफावलेल्या चायनीज वस्तूंच्या व्यापारात गेल्या काही वर्षापासून चायनीज फटाके ही मोठ्या प्रमाणात आले आहेत त्यामध्ये विषारी पदार्थांचे खूप मोठे प्रमाण असते 

याच्या निर्मितीसाठी पोटॅशियम क्लोराइड आणि पोटॅशियम परक्लोराईड याची रासायनिक मिश्रण वापरले जाते परंतु भारतात या रासायनिक पदार्थांच्या वापरावर बंदी आहे त्यामुळे चिनी बनावटीचे फटाके स्वस्त असले तरी अत्यंत प्रदूषणकारी आहेत

 भारत सरकारने चिनी फटाक्यांवर या दिवाळीचे निमित्ताने बंदी घातलेली आहे 'एक्सप्लोजिव्ह अॅक्ट 2008' नुसार परदेशी बनावटीचे स्फोटक पदार्थ बाळगणे आणि त्याची विक्री करणे हा दंडनीय अपराध आहे. तसेच देहली शासनाने चिनी फटाक्यांवर पूर्णतः बंदी घातली आहे. 

असे असले तरी अवैध मार्गाने चिनी फटाके भारतात आणले जाऊन त्याची विक्री होते यामुळे अशा फटाक्यांवर प्रशासनाने तात्काळ बंदी आणावी, तसेच चिनी फटाके विक्री करणाऱ्यांवर ही कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी आम्ही मागणी करत आहे

तसेच दिवाळीच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात मिठाईची विक्री होते याचा अपलाभ घेत अनेक व्यापारी मिठाईसाठी लागणारा कच्चा माल उदा. तूप, खवा, वर्ख इत्यादी मध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ करतात. 

यामागे अधिक नफेखोरीच्या उद्देशाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात घातले जाते. भेसळयुक्त मिठाईच्या सेवनाने गंभीर आजार होण्याची शक्यता असते 

तरी शासनाने मिठाई बनवणाऱ्या व्यापाऱ्यांची नियमित तपासणी करावी आणि भेसळयुक्त मिठाई बनवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करत आहोत.

Post a Comment

0 Comments