केंद्रस्तरीय टॅलेंट हंट स्पर्धेत भरघोस यश जि.प.प्रा.शाळा भिमनगर सांगोला
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
जिल्हा परिषद गुणवत्ता शोध(Talent Hunt ) केंद्रस्तरीय स्पर्धा,वार-बुधवार,दि. 09/10/2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुजारवाडी
सांगोला येथे सांगोला केंद्राचे केंद्रप्रमुख असलम इनामदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात. जि.प.प्रा.शाळा भिमनगर सांगोला शाळेतील विद्यार्थ्यांनी समूहगीत, लोकनृत्य, चित्रकला ,निबंध लेखन ,कथाकथन इत्यादी स्पर्धेत भाग घेतला होता.
समूह गीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक तर लोकनृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. समूह गीत गायन स्पर्धेत शाळेतील बाल कलाकार
आरोही वाघमारे, प्रभा ठोकळे ,आर्यन रणदिवे,हर्षद रणदिवे,अथर्व रणदिवे, अनुष्का धनवडे ,आरोही रणदिवे ,पौर्णिमा साठे, प्रतिज्ञा रणदिवे, रोहित रणदिवे यांनी "चला चला ,गाऊ चला"हे गीत सादर केले.
लोकनृत्य स्पर्धेत "नांदण, नांदण ,होतं रमाचं नांदण " या गीतांवर शाळेतील बाल कलाकारांनी लोकनृत्य सादर केले. यावेळी डॉ.भिमराव आंबेडकर यांची
वेशभूषा आर्यन रणदिवे याने तर माता रमाईची वेशभूषा शुभ्रा वाघमारे यांनी साकारली व बालकलाकार स्वाती गायकवाड, प्रभा ठोकळे, मंजू बनसोडे ,
प्राची रणदिवे, पूजा कांबळे ,सांची बनसोडे, रक्षा ठोकळे ,तृषाली जावीर, धनश्री रणदिवे, हर्षदा कांबळे, अथर्व रणदिवे यांनी अतिशय सुंदर नृत्य सादरीकरण केले. या कार्यक्रमाच्या वेळी पालकांचे विशेष सहकार्य मिळाले.
*🌷 समूह गीत गायन -प्रथम क्रमांक🌷*
तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड👍👍
*🌷लोकनृत्य -द्वितीय क्रमांक🌷*
💐💐 सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐💐
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिमनगर (सांगोला) मुख्याध्यापक व शिक्षक वृंद, पालक,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,उपाध्यक्ष व सदस्य*
0 Comments