सांगोल्यातील शिवशिल्प सोहळ्यामध्ये व्यासपीठावर आम.शहाजीबापू आणि अनिकेत भैयासाहेब यांच्या मनाचा मोठे पणा...
राजकारणापूरते राजकारण हे सांगोल्याचे आजपर्यंतचे वैशिष्ट्य आहे. 55 ते 60 वर्ष आबासाहेबांनी राजकारण केले
परंतु त्यांनी सामाजिक जीवनात कधीही कोणाला दुखावले नाही.. आमदार गणपतराव देशमुख साहेब आणि आमदार शहाजी बापू पाटील साहेब यांनी
आजपर्यंत सामाजिक जीवनात जीवनात कधीही कटुता येऊ दिली नाही. आज पुन्हा एकदा त्याची प्रचिती दिसून आली. सांगोल्यातील शिवशिल्प सोहळ्यामध्ये डॉक्टर अनिकेत देशमुख यांचे नावाचा पत्रिकेमध्ये उल्लेख नव्हता.
डॉ.अनिकेत देशमुख हे स्व.आबासाहेब यांच्या विचारावरती चालणारे असून आज पुन्हा ते दिसूनही सर्वांना आले. पत्रिकेत नाव नसतानाही सर्वसामान्य शिवप्रेमी नागरिकांप्रमाणे भव्य दिव्य कार्यक्रमास उपस्थिती
लावून स्टेज पुढे असणार्या अत्यंत नम्रपणे नागरिकांमध्ये जाऊन बसले... आबासाहेबांचा नातू आपल्या सोबत बसलाय यामुळे नागरिक ही अचंबित होत होते..
काही कालावधीनंतर सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे व्यासपीठावर आले.त्यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या लक्षात आले
की,आबासाहेबांचे नातू व सांगोला तालुक्याचे लोकप्रिय युवा नेते डॉ.अनिकेत देशमुख हे व्यासपीठावर नाहीत
हे त्यांना ही गोष्ट आवडली नाही. त्यामुळे आमदार शहाजी बापू पाटील यांनी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता स्वतः माईक घेऊन डॉक्टर अनिकेत देशमुख यांना स्टेज वरती आमंत्रित केले.
हा क्षण सांगोल्यातील जनता कधीही विसरणार नाही. आमदार शहाजीबापू पाटील यांनी डॉ.अनिकेत देशमुख यांचे नाव घेताच सर्वसामान्य नागरिकांमधून एकच जल्लोष झाला.
आमदार शहाजी बापू पाटील व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्यामध्ये 2019 साली चुरशीची विधानसभेची निवडणूक झाली होती. त्यावेळी डॉ. अनिकेत देशमुख यांचा अल्पशा मताने पराभव देखील झाला होता..
निवडणुकीनंतर गेल्या पाच वर्षात आमदार शहाजीबापू पाटील व डॉक्टर अनिकेत देशमुख हे अनेक वेळा समोरासमोर आले आहेत. अनेक वेळा शहाजीबापू व डॉ.अनिकेत देशमुख अनेक कार्यक्रमास उपस्थिती लावली आहे.
यावेळी आम. शहाजीबापू बोलताना म्हणायचे की आजपर्यंत आम्ही आबासाहेबांचे ऐकत आलो आहोत त्यामुळे तुम्ही आता आमचे ऐकायचे आहे (जेष्ठतेनुसार वयोमानानुसार)असे अनेक कार्यक्रमात बोलूनही दाखवले आहे.
स्व.आबासाहेब आणि आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगोल्यांची परंपरा आजपर्यंत ज्या पद्धतीने टिकवून ठेवली आहे तीच परंपरा या पुढील काळात देखील डॉ.अनिकेत देशमुख यांना टिकवावी लागणार आहे
हेच आजच्या या कार्यक्रमावरून दिसून आले आहे. नागरिकांमध्ये आमदार शहाजीबापू पाटील आणि अनिकेत भैया साहेब यांच्या आजच्या दिलदार पणाचे कौतुक झाले आहे.
त्यामुळे आज पुन्हा म्हणावेसे वाटते की शहाजी बापू आणि अनिकेत भैया साहेब आज तुम्ही पुन्हा जिंकलात... तुमच्या दोघांच्या मनाच्या मोठे पणास सलाम..
शब्दांकन....
संगोल्याचा एक जागृत नागरिक......
0 Comments