श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सांगोला यांच्या वतीने शनिवारी श्री दुर्गामाता महादौड चे आयोजन
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला 9 ऑक्टोबर (वार्ता ) - श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सांगोला यांच्या वतीने शनिवार, 12 ऑक्टोंबर या दिवशी सकाळी 6.30 वाजता शिवतीर्थ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सांगोला येथून श्री दुर्गा माता महादौड
चे आयोजन करण्यात आले आहे. या दुर्गामाता महादौड मध्ये सर्व शिवभक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री दुर्गा दौड चे प्रमुख प्रदीप जाधव यांनी केले आहे. या वर्षी पहिलेच वर्ष या श्री दुर्गा दौड चे असून
घटस्थापना पासून याचा प्रारंभ झाला आहे. प्रतिदिन सकाळी 6.30 वाजता शिवतीर्थ, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून छत्रपती शिवाजी महाराजांना जलाभिषेक करून तसेच त्यांना पुष्पहार अर्पण करून
त्याचबरोबर प्रारंभी प्रेरणा मंत्राने या दुर्गादौडची सुरुवात होते. प्रतिदिन शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये या दुर्गादौडचे आयोजन करण्यात आले होते. या दुर्गा दौडचे त्या त्या भागातील शिवभक्त नागरिकांनी मोठ्या
भक्ती भावाने स्वागत केले व भगव्या ध्वजाचे पूजनही केले विविध ठिकाणी प्रसाद वाटप ही करण्यात आला. याच पद्धतीने प्रतिदिन या दुर्गा दोडला प्रतिसाद वाढतच जात आहे. प्रत्येक भागात या दुर्गादोडचे झालेले
आगमन पाहून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, धर्मवीर संभाजी महाराजांचा विजय असो, जय भवानी जय शिवाजी त्याचबरोबर विविध प्रेरणा गीत
म्हटल्यामुळे वातावरणातील चैतन्य वाढत आहे. यावेळी शिवभक्तांनी भगवे फेटे, पांढरी टोपी, पारंपरिक वेश परिधान केले होते, या दुर्गा दौड मध्ये प्रमुख प्रदीप जाधव, डॉक्टर मानस कमलापूरकर, महेश महाराज गायकवाड,
किरण बुर्ले, शेखर चाळशी, श्रेयश बिनवडे, सोनू घोंगडे, कुमार कुलकर्णी, ओंकार कुलकर्णी, योगेश गुळमिरे, प्रभुराज पतंगे, सचिन काटे, गणपत पटेल, नवनाथ कावळे, यांसह अन्य शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
0 Comments