ईद ए मिलाद च्या हार्दिक शुभेच्छा :- मा. सुरजदादा बनसोडे
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला शहरामध्ये ईद ए मिलाद चा मुस्लिम समाजाने घेतलेल्या कार्यक्रमात नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांचा
मुस्लिम समाजाच्या वतीने आदर सत्कार करण्यात आला, आपल्या शुभेच्छा पर मनोगतात सुरजदादा म्हणाले की सांगोला तालुक्यातील मुस्लिम समाज शांतता प्रिय आहे त्यांनी सांगोला तालुक्यात
कधीच धार्मिक तेढ निर्माण होऊ दिली नाही, परंतु काही समाज कंटक व धार्मिक वाद निर्माण करणारे विघातक प्रवृत्तीचे लोक जाणीव पूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, ज्या वेळी असे वाद निर्माण होतात
त्या वेळी शांतता कमिटी मिटिंग मध्ये आम्हा आंबेडकरी नेत्यांना त्यांची बाजू योग्य असल्याने त्यांच्या बाजूने खंबीर पणे मते मांडून योग्य निर्णय द्यावा लागतो पण दुर्दैव असे की आज ह्या
कार्य क्रमात किंवा मुस्लिम समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात विद्यमान आमदार असेल किंवा माजी आमदार किंवा तालुक्यातील इतर भावी इच्छुक आमदार यांचा आदर सत्कार मुस्लिम समाज करतो पण त्यांचे धार्मिक सण साजरी करताना कोणीच
त्यांना विरोध होत असताना त्यांच्या न्याय हक्कासाठी धावून येत नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे असे सुरजदादा म्हणाले, पुढे बोलताना सुरजदादा यांनी उपस्थित
मध्ये आमदार शहाजी बापू पाटील , माजी आमदार दिपक आबा साळुंखे पाटील , डॉ अनिकेत देशमुख , नगरसेवक अस्मिर तांबोळी , अरुण आण्णा बनसोडे शब्बीर खतीब आदी सह हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने हजर होते
असलेल्या विद्यमान आमदार, माजी आमदार, व भावी इच्छुक आमदार यांनी भविष्यात मुस्लिम समाजाने त्यांचे धार्मिक सण आनंदाने साजरी करावेत असे त्यांना सहकार्य करावे ही त्यांना ईद ए मिलाद ची खरी शुभेच्छा असेल
0 Comments