google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक ... शेतात जात होते, विजेच्या तुटलेल्या तारांचा धक्का लागला, शेतकरी नवरा बायकोचा जागेवरच मृत्यू

Breaking News

धक्कादायक ... शेतात जात होते, विजेच्या तुटलेल्या तारांचा धक्का लागला, शेतकरी नवरा बायकोचा जागेवरच मृत्यू

धक्कादायक ... शेतात जात होते, विजेच्या तुटलेल्या तारांचा धक्का लागला, शेतकरी नवरा बायकोचा जागेवरच मृत्यू सोलापूर जिल्ह्यातील घटना..


सोलापूर : जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे गावच्या शेतकरी दाम्पत्याचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला आहे.

 शनिवारी सकाळी सव्वा नऊ वाजताची ही घटना आहे. अंबादास साळुंखे (वय ५५), कलावती साळुंखे (वय ४५) दोघे रा.

स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्यासमोर, अक्कलकोट असे मृत व्यक्तींची नावे आहेत. मयत दाम्पत्याच्या पश्चात मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

सदर घटनेप्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात महावितरण कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणे मृतांच्या नातेवाईकांना तत्काळ आर्थिक मदत देण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.

अधिक माहिती अशी की, अंबादास नामे शेतकरी हे घरामागील शेतात बाजरीवरील पाखरं हाकलण्यासाठी जात होते. शेतात महावितरणच्या तारा तुटून पडल्या होत्या. 

मात्र तारा तुटल्याचे अंबादास यांच्या लक्षात आले नाही. शेतात घाईघाईत जात असताना तुटलेल्या तारेचा धक्का अंबादास यांना लागल्याने ते जागेवर मृत्यूमुखी पडले.

नवऱ्याला वाचविण्यासाठी बायको गेली अन्...

पती अंबादास विजेच्या धक्क्याने तडफडत असताना पत्नी कलावती या त्यांना वाचविण्यासाठी गेल्या. अंबादास यांना तारांपासून बाजूला करण्याचा प्रयत्न त्या करू लागल्या. परंतु त्यांनाही विजेचा जोराचा धक्का बसून त्यांचाही सदर घटनेत मृत्यू झाला.

नातेवाईक आणि गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा, महावितरणविरोधात प्रचंड रोष

गावातील शेतकरी दाम्पत्याचा विजेच्या तारांनी धक्का बसून मृत्यू झाल्याची घटना माहिती पडल्यानंतर नातेवाईकांसह गावातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. 

दहिटने गावकऱ्यांनी वीज वितरण विभागाविरोधात संताप व्यक्त करत मृत दाम्पत्याचे मृतदेह घेऊन वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलन केले.

महावितरणविरोधात गुन्हा, नंतरच अंतिम संस्कार

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे सदर शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केल्याशिवाय आम्ही मृतांवर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांसह गावकऱ्यांनी घेतली. 

त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून वीज वितरणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दखल करण्यात आला. मृतांच्या नातेवाईकांना तत्काळ आर्थिक मदत करून देऊ, अशी लेखी हमीही महावितरणकडून देण्यात आली. 

दरम्यान मृतांचे शवविच्छेदन करून शनिवारी सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात दहिटणे येथे शेतकरी दाम्पत्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment

0 Comments