सांगोला तालुक्यातील विविध कृषी पुरस्कार मिळालेबद्दल ९ शेतकऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी):- राज्य शासनातर्फे सन २०२० ते २०२३ या वर्षीच्या पुरस्कार्थीचा पुरस्कार वितरण व सत्कार समारंभाचा कार्यक्रम होणार आहे. ९ विभांगामध्ये कृषी क्षेत्रात
उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सांगोला तालुक्यातील ९ शेतकऱ्यांचा विविध कृषी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली.
हा कार्यक्रम महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज रविवार (ता. २९) सायंकाळी ५ वाजता नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया (डोम), वरळी मुंबई येथे हा कार्यक्रम होणार आहे.
सांगोला तालुक्यातील आबासाहेब तुकाराम बंडगर (वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार २०२१), श्री. नाना यशवंत माळी (उद्यान पंडीत पुरस्कार २०२२), श्री. महेश पांडुरंग आसबे
(युवा शेतकरी पुरस्कार २०२२), श्री. सिद्धेश्वर महादेव जरे (मका राज्यस्तर विजेते क्रमांक-१), श्री. ईश्वर भिमराव कोळेकर (मका राज्यस्तर विजेते क्रमांक २), श्री.गिरजाप्पा रावसाहेब यमगर (मका राज्यस्तर विजेते क्रमांक-३),
श्री. सुमंत तुळशीराम पवार (मका राज्यस्तर विजेते क्रमांक-२), श्री. भिमराव राजाराम खर्चे (मका राज्यस्तर विजेते क्रमांक-३) व श्री. सोपान कृष्णा करांडे (सूर्यफूल राज्यस्तर विजेते क्रमांक-१) यांना पुरस्कार मिळणार आहेत.
शेतीमधील उत्पादकता आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना राज्य शासनाकडून पुरस्कार दिले जातात. यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सांगोला तालुक्यातील ९ शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
या पुरस्कार समारंभाला राज्यभरातील शेतकरी, अधिकारी, कृषी क्षेत्रातील तज्ञ आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. याचा उद्देश शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन
त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणे, तसेच राज्यातील शेती क्षेत्रात सकारात्मक बदल घडवणे हा असल्याचे तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले.
0 Comments