google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वामनराव शिंदे साहेब विद्यालयात डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जयंती सप्ताह साजरा

Breaking News

वामनराव शिंदे साहेब विद्यालयात डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जयंती सप्ताह साजरा

वामनराव शिंदे साहेब विद्यालयात डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा  जयंती सप्ताह साजरा 



सांगोला (प्रतिनिधी) शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

कमवा आणि शिका, हे ब्रीद घेऊन स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेत कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य बहुजनांच्या शिक्षणाच्या प्रसारार्थ अविस्मरणीय असल्याचे गौरवउद्गार ग्रामीण

 साहित्यिक प्रा. भास्कर बंगाळे  यांनी वामनराव शिंदे साहेब प्रशालेत डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137 व्या जयंती सप्ताह निमित्त प्रतिपादन केले .

सुरुवातीस पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सहसचिव नीलकंठ शिंदे सर यांनी उपस्थित

 मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.सोलापूर जिल्हा सेवानिवृत्त रयत सेवक मंडळ सोलापूर यांच्यातर्फे या सप्ताह योजनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

रयत शिक्षण संस्थेतील  सेवानिवृत्त  प्राचार्य  शंकर डुबल विद्यालयात  'रयत शिक्षण संस्था' व 'पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील' यांचे जीवन व कार्य तसेच महाराष्ट्र व कर्नाटकात त्या काळात 

त्यांनी शिक्षण प्रसाराचे कार्य मोठ्या प्रमाणावर केल्याने शिक्षणाची दारे खुली झाली,यावर शिक्षक, विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी पुरुषोत्तम पवार सर व संजय गोडसे सर यांनीही विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले. 

शाळेला कर्मवीर भाऊराव पाटील यांची प्रतिमा सप्रेम भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश पवार सर, सूत्रसंचालन संतोष कुंभार सर तर आभार अर्चना गोडसे मॅडम यांनी मानले.

Post a Comment

0 Comments