google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक ! 'घरात बसण्याऐवजी कामधंदा कर', या टोमण्याने एकुलता एक मुलगा संतापला; दगडाने डोकं ठेचत केली बापाची हत्या.

Breaking News

धक्कादायक ! 'घरात बसण्याऐवजी कामधंदा कर', या टोमण्याने एकुलता एक मुलगा संतापला; दगडाने डोकं ठेचत केली बापाची हत्या.

धक्कादायक ! 'घरात बसण्याऐवजी कामधंदा कर', या टोमण्याने एकुलता एक मुलगा संतापला; दगडाने डोकं ठेचत केली बापाची हत्या.


धुळे जिल्ह्यातुन अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका तरूणाने आपल्या वडिलांचा खून केल्याची घटना समोर आली आहे. 'घरात बसण्याऐवजी काही कामधंदा कर', 

असे वडिलांनी सांगितल्यानंतर मुलगा प्रचंड संतापला आणि वडिलांच्या या बोलण्याचा राग धरून त्याने वडिलांच्या डोक्यात दगड टाकून निर्घृणपणे हत्या केली.

एकुलत्या एक मुलाने वडिलांचा खून केल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. ही धक्कादायक घटना साक्री तालुक्यातील खरगाव येथे घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, बापू पांड्या कुवर असं मृत ५३ वर्षीय वडिलांचे नाव असून ते शेती काम करत होते. तर विजय कुवर (वय २५) असं मारेकरी मुलाचं नाव आहे. वडील जेवण करत असताना वडिलांच्या बोलण्याचा राग आल्याने विजय कुवर याने

 संतापाच्या भरात थेट दगडच वडिलांच्या डोक्यात टाकून वडिलांची हत्या केली. त्यानंतर वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात तसंच सोडून मुलाने घटनास्थळावरून काढला आहे.

घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपास यंत्रणांच्या माध्यमातून तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर खुनी मुलाच्या तपासासाठी शोधपथक सुद्धा तैनात करण्यात आले आहे. 

लवकरात लवकर मारेकरी मुलाचा शोध लावून त्याच्या मुसक्या आवळण्यात येतील, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

घटनेनंतर आरोपीचा पोबारा..

या घटनेची माहिती मिळाताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पहाणी करून बापू कुवर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपळनेर रुग्णालयात पाठवल्याची माहिती देण्यात आली.

 दरम्यान, मुलगा विजय कुवर हा चिडखोर स्वभावाचा असून त्याच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेनंतर तो पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments