google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील धक्कादायक बातमी..मुलीला सोडून येताना महूद येथे अपघात; वडिलांचा दुर्दैवी मृत्यू

Breaking News

सांगोला तालुक्यातील धक्कादायक बातमी..मुलीला सोडून येताना महूद येथे अपघात; वडिलांचा दुर्दैवी मृत्यू

सांगोला  तालुक्यातील धक्कादायक बातमी..मुलीला सोडून येताना महूद येथे अपघात; वडिलांचा दुर्दैवी मृत्यू


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : मुलीला सासरी सोडून घरी परतणाऱ्या वडिलांच्या दुचाकी व पिकअपच्या भीषण अपघातात पित्याचा जागीच मृत्यू झाला.

 हा अपघात गुरुवार ५ सप्टेंबर रोजी रात्री ७:३० च्या सुमारास महूद - दिघंची रोडवरील बेघर वस्तीनजीक घडला.

मल्हारी बोडरे (वय ५०, रा. शिरभावी, ता. सांगोला) असे मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,

 शिरभावी येथील मल्हारी बोडरे हे दुचाकीवरून मुलीला सासरी सोडण्यासाठी देवापूर (म्हसवड) ता. माण येथे सकाळी गेले होते.

 पाहुण्यांच्या पाहुणचार घेऊन परत दिघंचीकडून महूद मार्गे शिरभावी गावी निघाले होते, 

तर गार्डी (ता. पंढरपूर) येथील दूध डेअरीवरून दुधाचे कॅन घेऊन पिकअप महूदकडून दिघंची रोडने निघाला होता.

 दोन्हीही भरधाव वाहनांची बेघर वस्तीसमोर जोराची धडकून हा भीषण अपघात घडला. अपघातात मल्हारी बोडरे यांच्या डोक्यास गंभीर मार लागून जागीच ठार झाले

Post a Comment

0 Comments