सांगोला विधानसभा मतदारसंघाचं आमदार झाल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून
शहाजीबापू पाटील यांनी सांगोल्याला मिळवून दिले ग्लॅमर...
कधी काळी दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या सांगोल्याची आता राज्य पातळीवर विकसित मतदारसंघात नोंद झाली आहे.
आता हे सत्य दाबता येत नसल्यामुळे,तालुक्यातील आ.शहाजीबापू पाटील विरोधक थक्क झालेत!
अलीकडेच,गेल्या 2-3 वर्षात मका लागवडीत सांगोला तालुक्यानं महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला हे वृतमान पत्रात छापून आले..ही बातमी नुसती बातमी नाही तर, दुष्काळी भागाची जखम बरी झाल्याचे संकेत आहेत.
याआधी..असं कुठलही वर्ष सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नशिबात आलं नाही की, उत्पन्नाच्या,लागवडीच्या बाबतीत आपण राज्यात प्रथम क्रमांक मिळवावा !
साहजिकच हे यश.. सांगोला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील साहेब यांच्या प्रयत्नामुळे शक्य झाले आहे.
तालुक्याचा आमदार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहीला की, शेतकऱ्यांच्या जीवनाचं सोनं होतं असतं.खरं तर, गेल्या 50-60 वर्षांपासून, शेती, रोजगार, पायाभूत सुविधा या बद्दल कधीही सांगोला तालुक्यात विक्रमी काम झाले नाही.
आणि जी कामे झाली त्या कामांनी आपल्या तालुक्याची " भुक- तहान " कधी मिटलीच नाही...गेल्या 50-60 वर्षांपासून संपूर्ण सांगोला तालुक्यात इतक्या मोठ्या प्रमाणात जातीचं राजकारण चाललं होतं की, विकास करण्यासाठी तालुक्याला सक्षम नेतृत्वासाठी झगडावं लागलं.!!!
सध्याची सांगोला तालुक्यातील तरुण पिढी खरच खूप वैचारिक आणि स्वतंत्र विचारांची आहे त्यामुळेच सांगोला तालुक्यात २०१९ ला परिवर्तन झाले.
व या तालुक्याला एक चांगला काम करणारा आमदार मिळाला. तरुण पिढी ने मनात आणलं म्हणूनच हे शक्य झाले.
संपूर्ण तालुक्यात आज काय परिस्थिती आहे..? आज... सांगोला तालुक्याची आर्थिक व सामाजिक प्रगती झालेली आपणास दिसते.
ते पायाभूत सुविधा मजबूत झाल्यामुळे शक्य झाले आहे.
आणि सांगोला तालुक्यात पायाभूत सुविधा मजबूत करण्याचं काम आमदार शहाजीबापू पाटील साहेब यांनी केले आहे.
मग..असुरक्षित नेमकं कोण आहेत? आपली सत्ता गेली,आपल्याकडे नेतृत्व नाही.
झेडपी, पंचायत समिती, नगरपालिकेमध्ये प्रशासक आहे.
त्यामुळे सांगोला तालुक्यातील आ.शहाजीबापू पाटील यांच्या विरोधकांना सध्या करमत नाही.
त्यांच्या मनात प्रचंड नैराश्य पसरले असल्याने,आणि विकासकामांच्या जोरावर आ.शहाजीबापू पाटील पून्हा एकदा निवडुण येतील या शंकेने शहाजीबापूंना बदनाम कसं करता येईल यासाठी विरोधात असणारे सतत काही ना काही अफवा पसरवत आहेत.
आश्चर्यकारक म्हणजे, सांगोला तालुक्यात झालेल्या विकासकामांचे समर्थन आ.शहाजीबापू पाटील यांचे विरोधक करत नाहीत.
आणि झालेली विकासकामे बघून निराश होत आहेत.आता त्यांना ही शंका आहे की,आपल्या मनात असलेलं जातीय ध्रुवीकरण या विकास कामामुळे कठीण तर होणार नाही ना ?
धक्कादायक...आमदार होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले काही विकास कामांचे काहीही पडलेले नाही.ते फक्त आपल्या नावापुढे आमदार लागावं. यासाठी धडपडत आहेत.
आज सांगोला तालुक्यात अनेक ठिकाणी चिखल संपुष्टात आला आहे.( या आधी रस्त्यावरचा चिखल ५० वर्षे संपला नव्हता, चिखलातून वाट काढत काढत नागरीक चालत होते.
सगळीकडे फक्त आणि फक्त खड्डे दिसायचे.)चिखलाचे रस्ता जावून नवीन मुरुमीकरण, डांबरीकरण झालेले रस्ते दिसत आहेत.....!
हे पूर्णपणे वाचल्यानंतर, कृपया सर्वांना पुढे पाठवा जेणेकरून प्रत्येकाला कळेल की आपल्या सांगोला तालुक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत.
व गेल्या 50 वर्षांच्या तुलनेत 2019 ते 2024 हा कार्यकाळ सोनेरी इतिहास म्हणून ओळखला जाणार आहे,कारण या कालावधीत सुमारे 5000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी
सांगोला तालुक्यात आ.शहाजीबापू पाटील साहेब यांनी मंजूर करून आणला आहे..व दररोज या विकास निधीमध्ये वाढच होत चालली आहे.
— *आ.शहाजीबापू पाटील समर्थक*
0 Comments