सांगोला तालुक्यात बहुजन समाज पार्टीचा जागृती महाअभियान यात्रेचा प्रारंभ सोनंद गावातून.
.
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला तालुक्यात बहुजन समाज पार्टीचा जागृती महाअभियान यात्रेचा प्रारंभ सोनंद गावातून करण्यात आला. त्यावेळी
आपल्यात आपण लग्न श्रीमती मंगल बाबू ठोकळे यांची सांगोला विधानसभा महिला अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली .
भारत स्वातंत्र्य झाल्यापासून ते आजपर्यंत बहुजन समाजाने काँग्रेस, भाजप व त्यांचे मित्रपक्ष यांनाच मतदान केले आहे .
परंतु आजपर्यंत बहुजन समाजाने स्वतंत्र भारतामध्ये माणूस म्हणून जगण्याचा त्यांचे न्याय, स्वतंत्र्य ,समता किंवा त्यांच्या जीवनामध्ये कोणताही बदल घडलेला नाही. आज पर्यंत या सत्ताधारी पक्षाने
या लोकांच्या मताचा वापर करून बहुजन समाजामध्ये कष्टकरी, शेतकरी, मजूर ,महिला दलित ,अल्पसंख्याक यांना आर्थिक दृष्ट्या मागास ठेवून त्यांना गुलाम ठेवण्याचे काम केले आहे.
या देशाची संपूर्ण संपत्ती फक्त 10% लोकांकडे ठेवून त्यांची चाकरी करण्याचे काम या सत्ताधारी पक्षाने केले आहे.
म्हणून सामान्य जनतेला त्यांचे अधिकार त्यांच्यामध्ये समतेचे वातावरण, न्याय व स्वातंत्र भारतामध्ये बहुजन समाजाला गुलाम करू
पाहणाऱ्या या प्रस्थापित लोकांपासून स्वतंत्र देण्याचे काम व बहुजन समाजामध्ये मतदानाची ताकद ही प्रस्थापित व्यवस्था उलथून टाकण्याची व तुम्हाला सत्ताधीश बनवण्याची आहे,
ही जाणीव करून देण्याचे काम बहुजन समाज पार्टी या बहुजन समाज जनजागृती महाअभियान यात्रेच्या निमित्ताने करणार आहे.
याची सुरुवात सोनंद या गावातून करण्यात आली. सोनंद गावातील पुरुष व महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
विधानसभा महिला अध्यक्ष म्हणून निवडलेल्या श्रीमती मंगल बाबू ठोकळे यांनी बहुजन समाज पार्टी सांगोला तालुक्यामध्ये क्रांती करण्याचे काम करेल व त्यामध्ये महिलांचा सहभाग हा प्रामुख्याने असेल असे आश्वासन दिले.
यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी मा.भालचंद्रजी कांबळे ,बसपाचे जिल्हा प्रभारी मिलिंदजी बनसोडे, विधानसभा प्रभारी कुंदनजी बनसोडे,
विधानसभा युवा अध्यक्ष बाळासाहेब गडहिरे, विधानसभा तालुकाध्यक्ष संदीप बनसोडे, विधानसभा महासचिव अजय ठोकळे ,विधानसभा बी व्ही फ अमर सोनावणे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments