जय मल्हार अहिल्यादेवी गणेशोत्सव तरुण मंडळ अहिल्यानगर सांगोला
यांच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न गणेशोत्सव मंडळास 55 वर्षाची लाभली परंपरा
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला/ प्रतिनिधी: जय मल्हार अहिल्यादेवी गणेशउत्सव तरुण मंडळ अहिल्यानगर सांगोला या गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सांगोला येथे विविध प्रकारचे कार्यक्रम पार पाडून
आपली 55 वर्षाची अखंड परंपरा जोपासली आहे .शनिवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली.
सोमवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी या मंडळाच्या श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक कार्यक्रम संपन्न झाला .या श्रीगणेश विसर्जन कार्यक्रम प्रसंगी माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा व
शिवसेना महिला तालुकाध्यक्षा राणीताई माने ,माजी नगरसेवक व शिवसेना शहर संघटक आनंदाभाऊ माने यांच्या शुभहस्ते विसर्जन मिरवणूक आरती व मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंडळाच्या वतीने घेण्यात
आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम या मान्यवरांसह धनगर समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप जानकर, मायाक्का प्रतिष्ठानचे अध्यक्ष काशिलिंग गावडे, माजी नगरसेवक छायाताई मेटकरी, सुरेश गावडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
जय मल्हार अहिल्यादेवी गणेशउत्सव तरुण मंडळाच्या वतीने लहान मुलांसाठी लिंबू चमचा व संगीत खुर्ची स्पर्धा, तसेच रंगभरण स्पर्धा ,वैयक्तिक आणि सामूहिक नृत्यस्पर्धा ,
मोदक व रांगोळी स्पर्धा, महिलांसाठी फनीगेम स्पर्धा ,धनगरी ओव्यांचा कार्यक्रम ,जय मल्हार लेझीम मंडळांचा लेझीम कार्यक्रम व
सांगोला शहरात प्रथमच या मंडळाच्या वतीने आघोरी तांडव नृत्य हा नृत्य प्रकार संपन्न झाला. मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे हे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने भाविकभक्त नागरिक महिला भगिनी उपस्थित होते .
मंडळाचे सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी अध्यक्ष निशांत मिसाळ, उपाध्यक्ष सचिन गावडे, खजिनदार संदीप कोळेकर ,सचिव संजय गावडे, सहसचिव तुकाराम शेजाळ यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेत
गणेशोत्सव कार्यक्रम पार पाडला. यासाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन व तरुण मित्रांचे सहकार्य मिळाल्याने हा कार्यक्रम अतिशय आनंदामध्ये व उत्साही वातावरणात संपन्न झाल्याची माहिती अध्यक्ष निशांत मिसाळ यांनी दिली.
0 Comments