वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयाचा 38 वा वर्धापन दिन साजरा.
सांगोला ( प्रतिनिधी) शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
शिक्षक विद्यार्थ्यांना संस्कार देऊन घडवण्याचे कार्य शाळेमध्ये करतात.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता शाळेत जे संस्कार केले जातात त्या आधारेच विद्यार्थी समाजात घडत जातात .
याकरिताच 38 वर्षापूर्वी शिंदे साहेबांनी या प्रशालेचे रोपटे लावून ज्ञानार्जनाचे दालन खुले केले त्यामुळेच हा वटवृक्ष बहरलेला दिसून येतो.
विद्यार्थ्यांनीही शालेय जीवनात भरपूर परिश्रम घेऊन उद्याचे सक्षम नागरिक तयार व्हावेत असे प्रतिपादन प्रशालेच्या 38 व्या वर्धापन दिनानिमित्त सांगोला केंद्राचे केंद्रप्रमुख अस्लम इनामदार साहेब यांनी केले
कार्यक्रमाची सुरुवातीस सरस्वती व संस्थापक वामनराव शिंदे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन उद्योगपती गिरीशभाऊ नष्टे, संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम, विलासराव पाटील सर, नीलकंठ शिंदे सर, सजाबई पवार,विठ्ठलपंत शिंदे सर या मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी प्रमुख मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक रमेश पवार यांनी केले.
वर्धापन दिनानिमित्त गिरीश नष्टे ,विलास पाटील सर, सुवर्णा इंगवले मॅडम यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करून संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी वर्धापन दिनानिमित्त नृत्य सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,आभार संतोष कुंभार सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
0 Comments