google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..सांगोला येथील जि.प.बांधकाम उपअभियंता मिलींद ठोंबरे यांनी कृषीभूषण आबासाहेब बंडगर यांच्यासह कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची दिली धमकी

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..सांगोला येथील जि.प.बांधकाम उपअभियंता मिलींद ठोंबरे यांनी कृषीभूषण आबासाहेब बंडगर यांच्यासह कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची दिली धमकी

ब्रेकिंग न्यूज..सांगोला येथील जि.प.बांधकाम उपअभियंता मिलींद ठोंबरे


यांनी कृषीभूषण आबासाहेब बंडगर यांच्यासह कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची दिली धमकी

सांगोला तालुक्यात भ्रष्टाचार वाढला बांधकाम अभियंता पासून जीवितास धोका

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला प्रतिनिधी :- सांगोला शहर व तालुक्यात राजकीय वरदहस्थामुळे भ्रष्टाचाराचा कहर केला आहे काही अधिकारी पैसे शिवाय बोलतच नाहीत सांगोला येथील जिल्हा परिषदेच्या बांधकाम अभियंत्यांनी शिरभावी गावाच्या

 विकासासाठी विकास कामांची व रस्त्याची माहिती घेण्यासाठी गेल्यावर टक्केवारी दे फुकट कामे होत नाहीत म्हणत युवा सामाजिक कार्यकर्त्याला गच्चीला धरून शिवीगाळ करून तुला व तुझे कुटुंबीयांना जीवे ठार मारतो

 अशी धमकी  दिली आहे या बांधकाम अभियंता पासून मला व माझ्या कुटुंबीया च्या जीवितास धोका असून पोलीस संरक्षण देण्याची मागणी कृषी भूषण व सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब बंडगर यांनी केली आहे

सर्वच शासकीय कार्यालयात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे प्रचंड प्रमाणात अधिकारी खुलेआम पैशाची मागणी करतात सर्वसामान्यांची लूट होत असताना

 लोकप्रतिनिधी व विरोधी पक्षाचे नेतेमंडळी अधिकाऱ्यांकडून अर्थपूर्ण वाटाघाटी केल्यामुळे मूग गिळून गप्प आहेत जिल्हा परिषदेच्या बांधकाम अभियंता मिलिंद ठोंबरे यांच्या विभागात झालेली कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत

 प्रत्येक कामात अर्थपूर्ण वाटाघाटी केल्या जातात टक्केवारी घेतल्याशिवाय कोणाचेच काम केले जात नाही दादागिरीची भाषा वापरली जाते अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते

 आबासाहेब बंडगर यांनी यापूर्वीही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे अभियंता यांच्या केबिनमध्ये आबासाहेब बंडगर गेल्यानंतर त्यांनी शिरभावी गावातील विविध विकास कामाची चौकशी केल्यानंतर उपस्थित

 असलेल्या उप अभियंत्याने तू मला आधी कामाचे पैसे दे पैसे दिल्याशिवाय तुझे काम होणार नाही मी टक्केवारी दिल्याशिवाय कोणाचेच काम करत नाही फुकट कामे कराया करण्यासाठी मी नोकरीला लागलोय 

काय असे म्हणून मी ज्या समाजात जन्मलो त्या समाजावरून मला शिव्या दिल्या व मला गच्चीला धरून शिवीगाळ करत बाहेर काढले तू जा नाहीतर तुला व तुझे कुटुंबीयांना गावात

 येऊन घरात घुसून मारिन व जीवे ठार मारीन अशी धमकी कृषीभूषण आबासाहेब बंडगर यांना दिली त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे या उपअभियत्याच्या मालमत्तेची व जीवे ठार मारण्याची दिलेल्या धमकीची चौकशी

 करून या अभियंत्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी व सेवेतून बडोतर्फ करावे अशी मागणी कृषिभूषण आबासाहेब बंडगर यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे करून मला व माझ्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण मिळावे

 अन्यथा मी एक ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषणाला बसणार आहे याची नोंद घेण्यात यावी असे निवेदनात नमूद केले आहे तालुक्यातील अनेक अधिकारी लाच लुचपत खात्याच्या यादीवर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

Post a Comment

0 Comments