google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी.. सांगोला तालुक्यात पुन्हा दमदार पाऊस; ५० मिलिमीटर पावसाची नोंद

Breaking News

मोठी बातमी.. सांगोला तालुक्यात पुन्हा दमदार पाऊस; ५० मिलिमीटर पावसाची नोंद

मोठी बातमी.. सांगोला तालुक्यात पुन्हा दमदार पाऊस; ५० मिलिमीटर पावसाची नोंद


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : सांगोला शहर व तालुक्यातील सर्वच मंडळामध्ये सोमवारी (ता. १९) ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तालुक्यात एक जूनपासून आतापर्यंत ४३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत १२७.२४ मिलिमीटर पाऊस झाला आहे.सोमवारच्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे एक गाय व म्हशीचा मृत्यू झाला आहे. हा पाऊस खरीप पिकासाठी मात्र उपयोगी ठरणार आहे.

तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून पावसाची हुलकावणी सुरू होती. काही ठिकाणी तुरळक तर मध्यम स्वरूपाचा अचानकपणे पाऊस झाला होता. गेला दोन-तीन दिवसांमध्ये हवामान मोठा उकाडा जाणवत होता. मात्र सर्वत्र पाऊस झाला नव्हता.

तालुक्यात ३८ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. या खरीप पिकांना पाण्याची जरुरी होती. सोमवारी (ता. १९) रात्री तालुक्यातील सर्वच महसूल मंडलांमध्ये कमी अधिक ५०.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

यामध्ये सर्वाधिक नाझरा मंडलमध्ये ११०.३ मिलिमीटर तर सर्वात कमी महूद मंडलमध्ये ११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात एक जूनपासून 

आतापर्यंत ४३०.३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर ऑगस्ट महिन्यामध्ये १२७.२४ किलोमीटर पाऊस झाला आहे. खरीप पिकांना हा पाऊस अतिशय फायदेशीर ठरला आहे.

या वादळी वारे व पावसामुळे सोमवारी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास तरंगेवाडी येथील वसंत तुकाराम बंडगर यांची एक गाय मृत्युमुखी पडली आहे. तर सरगरवाडी येथे सिकंदर मौला नदाफ यांच्या म्हैशीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.

 सांगोला तालुक्यात पावसाचा गुंगारा; आतापर्यंत फक्त ९.६ टक्केच पेरण्या

मंडलनिहाय झालेला पाऊस (मिमी)

सांगोला- ६६.८

शिवणे- ५६,

जवळा -३५.५

हातीद- ६७

सोनंद- १४

महूद -११

कोळा- ५३

नाझरा- ११०.३

संगेवाडी -३६.८

एकूण -५०.०४

Post a Comment

0 Comments