सांगोला तालुक्यातील घटना..तू मला उसने घेतलेले पैसै मागतो काय असे म्हणून तुला आता
खलासच करतो असे म्हणून चाकूने वार केल्याने तरुण गंभीर जखमी..
सांगोला : दोन महिन्यापूर्वी घेतलेले उसने पैशाच्या कारणावरून एकाने दुसऱ्यावर चाकूने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला
असल्याची घटना रविवार दि.१८ ऑगस्ट रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास चिणके ता. सांगोला येथे घडली आहे.
यामध्ये पांडूरंग नारायण मिसाळ (वय ३५ रा.चिणके, ता.सांगोला) हे जखमी झाले आहेत. नारायण नामदेव मिसाळ रा.चिणके ता.सांगोला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार
नारायण मिसाळ यांचा मुलगा पांडूरंग मिसाळ यांचेकडून दत्तात्रय मिसाळ याने दोन महिन्यापूर्वी २५ हजार रुपये उसने घेतले होते रविवार दि.१८ रोजी पांडूरंग मिसाळ हे चिणके येथील एस.टी स्टँड शेजारी असलेल्या विनायक खंडागळे यांचे सलून दुकानामध्ये कटिंग करणेकरीता गेले
असताना दत्तात्रय मिसाळ याने तू मला उसने घेतलेले पैसै मागतो काय असे म्हणून तुला आता खलासच करतो असे म्हणून चाकूने डोकीस, हनुवटीस व हाताच्या पंजावर वार करून गंभीर जखमी केले असल्याची घटना घडली आहे
याबाबत जखमी पांडूरंग मिसाळ यांचे वडील नारायण मिसाळ यांनी दत्तात्रय मि साळ याचे विरूद्ध जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने वार करून जखमी केले असल्याबद्दल गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सांगोला पोलीस ठाण्याकडून मिळाली आहे.
सांगोला तालुक्यात गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला असून एखादा दिवस वगळता तालुक्यात कोठे ना कोठे गंभीर गुन्हे घडत असल्याने सर्वसामान्य जनतेमधून चिंतेचे वातावरण व्यक्त होत आहे.
0 Comments