खळबळजनक ..हे थांबणार तरी कधी? बदलापूर पाठोपाठ आता पुणेही हादरले
राज्यात बदलापूर आणि अकोल्याची घटना ताजी असतानाच पुण्यातूनही एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. पुण्यातही एका अल्ववयीन मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले.
त्यावेळी तिचा व्हिडीओही काढण्यात आला. त्यानंतर हा प्रकार सतत सुरू होता. डिसेंबर 2022 ते जुलै 2024 पर्यंत हा प्रकार सुरू होता.
तिला ब्लॅकमेल करून त्या नराधमाने तिच्या आईचे दागिने चोरण्यास सांगितले. त्याच्या सांगण्यावरून तिने जवळपास वीस लाखाचे दागिने चोरले. घरातून दागिने गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला आहे.
हर्ष महेंद्र महाडिक या 21 वर्षाचा आरोपी कात्रजच्या गोकुळनगर इथे राहातो. त्याने त्याच भागात राहाणाऱ्या अल्पवयीन मुलीला आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केले.
शिवाय त्याचे व्हिडीओही बनवले. त् यातून तो तिला सतत ब्लॅकमेल करत होता. त्यातून गेली दोन वर्ष हा प्रकार सुरू होता. त्या मुलीचे वय 15 वर्षे आहे. त्याच्या ब्लॅकमेल पुढे तिला काही करता येत नव्हते.
ती हताश झाली होती. तो जे सांगत होता ते तिला करावे लागत होते. पुढे हर्षने आपली मागणी वाढवली. त्याने तिला तिच्याच घरात चोरी करण्यास भाग पाडले. मुलीनेही भितीपोटी तब्बल वीस लाख रूपये किंमतीचे दागिने चोरले.
ते दागिने तिने त्या आरोपीला दिले. घरात दागिने नसल्यामुळे सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. दागिने परत करण्यासाठी तिने त्याच्या मागे तगादा लावला. पण तो दागिने देण्यास टाळाटाळ करत होता.
घरच्यांनी मुलीकडे याबाबत विचारणा केली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. याबाबत मुलीने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी हर्ष याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
0 Comments