महिलांनो तुम्हाला 'ती' चूक पडेल महागात, योजनेचे पैसे मिळून सुद्धा रिकामे राहतील हात
राज्य सरकारने सूरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योनजेत लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित 3000 रूपये जमा करण्यात आले आहेत.
ज्या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत. त्या महिलांना या योजनेचे लाभ मिळाला आहे. मात्र हे पैसे मिळून सुद्धा अनेक महिलांचे हात रिकामे राहिले आहेत. त्यामुळे महिलांना मोठा धक्का बसला आहे.
लाडकी बहिण योजनेचे फॉर्म भरताना अनेक महिलांनी आपला अर्ज व्यवस्थित भरला होता. सध्या व्यवहारात असलेल्या बँकेचे तपशील देखील दिला होता. मात्र हा अर्ज भरताना महिलांकडून एक गोष्ट राहूनच गेली.
ती गोष्ट म्हणजे आधारकार्डशी लिंक असलेले बँक अकाऊंट जोडणे. महिलांनी आपलं आधारकार्ड नेमकं कोणत्या खात्याशी लिंक आहे, याची पडताळणी न करताच अर्ज भरला होता. याचाच महिलांना मोठा धक्का बसला.
त्याचं झालं असं की सरकारने योजनेचे पैसे पाठवताना आधार क्रमांकाच्या सहाय्याने पैसे पाठवले आहेत. त्यामुळे ज्या महिलांचे आधारकार्ड ज्या बँकेशी लिंक आहे,
त्याच खात्यात पैसे जमा झाले आहेत. म्हणजेच जर तुम्ही कोणतेही पहिले जूने अकाऊंट उघडले असेल आणि सध्या ते वापरत देखील नसला असाल आणि त्या बँकेशी आधार लिंक असेल तर तरी त्यात पैसे जमा झाले आहेत.
काही प्रकरणात तर असे देखील झाले आहे की अनेक महिलांच्या जून्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. आणि त्या खात्यात पैसे जमा झाल्या झाल्याच पैसे कट झाले आहेत.
यामागचे कारण म्हणजे महिलांनी त्याच्या खात्याची पैसे ठेवण्याची मर्यादा न पाळल्याने त्यांचे पैसे कट झाले आहेत. त्यामुळे महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊन देखील त्यांचे हात रिकामे राहिले आहेत.
त्यामुळे आता सरकार या प्रकरणात महिलांचे बँकेत कट झालेले पैसे मिळवून देते का? किंवा बँकांना काही आदेश देते की नाही? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
0 Comments