google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धनगर समाज सेवा महिला मंडळ सांगोला यांच्या वतीने सांगोला पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी बांधवांना बांधल्या राख्या

Breaking News

धनगर समाज सेवा महिला मंडळ सांगोला यांच्या वतीने सांगोला पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी बांधवांना बांधल्या राख्या

धनगर समाज सेवा महिला मंडळ सांगोला यांच्या वतीने सांगोला पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी बांधवांना बांधल्या राख्या



(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)




सांगोला /प्रतिनिधी: धनगर समाज सेवा महिला मंडळ, सांगोला यांनी रक्षाबंधन सणानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत 

सांगोला पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी  बांधवांना राख्या बांधून औक्षण करीत शुभेच्छा दिल्या. सामाजिक बांधिलकी जोपासत धनगर समाज सेवा महिला मंडळ

 व सदस्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना राख्या बांधून भाऊ बहिणीचे अतूट नाते जोपासले आहे. या  कार्यक्रमाबद्दल धनगर समाज सेवा महिला मंडळातील भगिनींचे विशेष कौतुक होत आहे. 

या कार्यक्रमासाठी शिवसेना महिला तालुकाप्रमुख माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने, शिवसेना महिला शहर प्रमुख व माजी नगरसेविका छायाताई मेटकरी,

 सेवानिवृत्त शिक्षिका आशा सलगर ,शांता हाके, नकुशा जानकर ,रूपाली मदने, शीला माने ,शितल वाघमोडे, वैशाली गाडवे, वैभवी देशपांडे आदी महिला भगिनी उपस्थित होत्या. 

या महिला भगिनीकडून सांगोला पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी एपीआय सचिन जगताप, हवालदार बगाडे,ए.एस .आय. कल्याण ढवणे, पी.एस.आय दत्तात्रय पुजारी, सपोनी पवन मोरे, बजरंग बोराटे, 

जयवंत माळी, निशांत सावजी ,गणेश कुलकर्णी आदींना राख्या बांधल्या. यावेळी पी.एस.आय .रूपाली उबाळे, शबनम शेख मॅडम, सविता माळी यांच्यासह आदी पोलीस अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments