google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक..! पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडुन दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील धक्कादायक घटना -

Breaking News

धक्कादायक..! पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडुन दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील धक्कादायक घटना -

धक्कादायक..! पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडुन दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू;


मंगळवेढा तालुक्यातील धक्कादायक घटना - 

घराच्या शेजारी पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून एका दोन वर्षांच्या बालकाचा  मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथे घडली आहे.

श्रेयश सोमनाथ लोहार (वय 2, मुळ गाव जांभुळणी ता.आटपाडी जि. सांगली सध्या भाळवणी) असे मयत झालेल्या बालकाचे नाव आहे.

मयत बालकाचे आजोबा मर्याप्पा बळीराम टकले (वय.57 रा.भाळवणी ता.मंगळवेढा) यांनी मयताची खबर दिली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आज दि.20 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मी माझे राहते 

घरी पिण्याचे पाणी आणणेकामी आमचे शेजारी असलेले राजु स्वामी यांच्या शेतात जात असताना माझा नातु श्रेयस लोहार हा घराचे समोर अंगणात खेळत होता.

त्यानंतर फिर्यादी राजु स्वामी यांच्या शेतातुन पिण्याचे पाणी घेवुन 10.30 वा. फिर्यादीच्या घरी परत आलो असता फिर्यादीचा नातु श्रेयस हा अंगणात खेळत असलेला दिसला नाही, 

त्यावेळी मी माझी मुलगी अर्चना लोहार व तिची सासु संगिता संजय लोहार यांना श्रेयस कोठे गेला आहे असे विचारले असता तो कुठे गेला आहे

मला माहित नाही असे सांगितल्यानंतर आम्ही सर्वजण श्रेयस याचा घराचे आजुबाजुला शोध घेत असताना तो घराचे शेजारी पावसाचे पाण्याने भरलेल्या खड्यामध्ये बेशुद्ध अवस्थेत पड़लेला दिसला.

त्यावेळी मी व माझी मुलगी अर्चना लोहार तसेच तिची सासु संगिता लोहार असे माझा नातु श्रेयस यास पाण्यातुन बाहेर काढुन पाहिले

 असता तो बेशुद्ध पडलेला होता काही एक हालचाल होत नसल्याने त्यास आम्ही औषधउपचारास प्रथम कुंभारे हॉस्पिटल मंगळवेढा येथे घेवुन गेलो असता

तेथील वैद्यकिय अधिकारी यांनी त्यास तपासुन पुढील औषधउपचारकामी महिला हॉस्पिटल मंगळवेढा येथे सकाळी 11.30 वा. उपचार करणेकामी अँडमिट केले

 असता त्याचवर उपचार चालु असताना तो 12/35 वा. मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments