google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्हा हादरला! चॉकलेटचे अमिष दाखवून शाळकरी मुलीसोबत संतापजनक कृत्य; दोन वृद्धांवर गुन्हा

Breaking News

सोलापूर जिल्हा हादरला! चॉकलेटचे अमिष दाखवून शाळकरी मुलीसोबत संतापजनक कृत्य; दोन वृद्धांवर गुन्हा

सोलापूर जिल्हा हादरला! चॉकलेटचे अमिष दाखवून शाळकरी मुलीसोबत संतापजनक कृत्य; दोन वृद्धांवर गुन्हा


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे 9503487812)

चॉकलेट आणि पैशाचे आमिष दाखवून दोन वृद्धांनी 11 वर्षांच्या शाळकरी मुलीचा विनयभंग केला. ही धक्कादायक घटना

 सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

निळू बळीराम माने (वय 60) आगतराव मुळे (वय 80) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

 मिळालेल्या माहितीनुसार,पीडित अल्पवयीन मुलीचे आई-वडील रोजंदारी करतात. 25 ऑगस्टला देखील ते रोजंदारीसाठी निघून गेले. तेव्हा पीडित मुलगी आणि तिचे भावंड घरी होते.

दरम्यान, पीडिता परिसरात असलेल्या एका किराणा दुकानामध्ये खरेदीसाठी गेली असता, आरोपीने तिचा हात पकडला. तुला चॉकलेट आणि खाऊ देतो असं म्हणत दोघांनीही पीडितेसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या तावडीतून पीडितेने कशीबशी आपली सुटका केली.

सायंकाळी आई-वडील कामावरून परत आल्यानंतर त्यांना मुलगी रडताना दिसली. तेव्हा विचारणा केली असता, पीडितेने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेऊन यासंदर्भात तक्रार दाखल केली.

 तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.मुलगी दोन रुपयांची चॉकलेट आणण्यासाठी दुकानात गेल्यानंतर आरोपीने डावा हात धरून थांबून घेतले आणि पैसे देऊ लागले. दुसऱ्याने तुला काय पैसे लागतील.

ते मी देत जाईन. फक्त तू मंदिराकडे येत जा,असे म्हणत पाचशे रुपये दिले. तसेच गळ्यातील मण्यांची माळ धरून कुणालाही याबाबतचे सांगू नकोस म्हणून पीडितेस सांगितले.

याप्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात दोन्ही वृद्धांविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

तुला काहीही कमी पडू देणार नाही, आयुष्यभर तुझा सांभाळ करतो. यापुढेही सुट्टी असली तर तू दुकानात येत जा, असे म्हणत आरोपींनी पीडितेसोबत लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे

Post a Comment

0 Comments