google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक! बनावट कागदपत्राद्वारे जमीन बळकाविण्याचा प्रयत्न; वारसाची पोलिसांत धाव; निवृत्त अधिकाऱ्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल सांगोला तालुक्यातील घटना..

Breaking News

खळबळजनक! बनावट कागदपत्राद्वारे जमीन बळकाविण्याचा प्रयत्न; वारसाची पोलिसांत धाव; निवृत्त अधिकाऱ्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल सांगोला तालुक्यातील घटना..

खळबळजनक! बनावट कागदपत्राद्वारे जमीन बळकाविण्याचा प्रयत्न; वारसाची


पोलिसांत धाव; निवृत्त अधिकाऱ्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल सांगोला तालुक्यातील घटना..

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला:- बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनी बळकावण्यासासाठी आपली स्वतःची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी अजय भारत पाटील (रा.वाढेगाव, ता.सांगोला) 

यांनी सांगोला पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार पोलिसांनी शंकर विश्वनाथ पाटील (रा. कडलास रोड, सांगोला) या निवृत्त अधिकाऱ्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी अजय पाटील यांचे वडील भारत हे सन २०११ साली मयत झाले असून, त्यांची सांगोला येथे वडिलोपार्जित मालकी कब्जेवहिवाटीची (सव्र्व्हे नंबर ११३/२, क्षेत्र १ हे. २४ आर) शेतजमीन आहे.

वडील मयत झाल्यानंतर फिर्यादी, त्यांची आई व दोन बहिणी यांचे नावे या जमिनीवर वारसाहक्काने नोंद झाली आहेत.

दरम्यान, त्यांच्या भावकीतील शंकर विश्वनाथ पाटील (रा. कडलास रोड, सांगोला) हे mone लघुपाटबंधारे विभागात सरकारी नोकरी करीत होते; परंतु आता ते सेवानिवृत्त झाले आहेत.

 त्यांनी फिर्यादीच्या वडिलोपार्जित मिळकतीबाबत व कुटुंबाबात माहिती दिली आहे.

फिर्यादीचे वडील मृत भारत लक्ष्मण पाटील यांना बाबासाहेब केशव पाटील, रामचंद्र केशव पाटील, सर्जेराव केशव पाटील असे तीन चुलते होते. त्यांपैकी

 बाबासाहेब केशव पाटील हे अविवाहित मृत झाल्याने त्यांना इतर कोणीही वारस नाहीत. फिर्यादीचे वडील मृत झाल्याने उदरनिर्वाहासाठी फिर्यादी मुंबईला गेले होते.

बोगस आधार कार्डचा केला वापर

सन २०१४ सालापासून आरोपी यांनी स्वतःच्या खऱ्या नावाऐवजी बनावट नाव लावण्यासाठी स्वतःच्या नावाचे खोटे आधार कार्ड, पॅन कार्ड तयार करून सदर खोट्या आधार कार्ड व पॅन कार्डवर नाव बदल केले.

किंवा बोगस आधार कार्डाच्या आधारे ३१ मार्च २०२३ रोजी कार्यकारी दंडाधिकारी, सांगोला यांच्यासमोर बनावट नावाने स्वतः हजर राहून खोटे वंशावळीचे

 प्रतिज्ञापत्र करून त्या आधारे गॅझेट करून बनावट नावाने स.नं. ११३/२ या मिळकतीस नावे लावण्यासाठी बाबासाहेब केशव पाटील यांचा वारस स्वतः आहे 

म्हणून अर्ज दाखल केला आहे. नमूद गुन्हा नोंदलेल्या आरोपींनी जमीन लुबाडण्यासाठी हे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments