मोठी बातमी ... शरद पवार, मोहिते-पाटील अन् सुशील कुमार शिंदेंची सोलापुरात एकत्रित ताकद मिळणार, या मतदारसंघावर पडणार मोठा प्रभाव
लापूर : लोकसभा निवडणुकीत या जिल्ह्यात शरद पवार, सुशील कुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील या तीन नेत्यांचं सुत पुन्हा जुळले.
यामुळे जिल्ह्यातील माढा आणि सोलापुर लोकसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीने दणदणित विजय मिळवला.
त्यामुळे या मतदारसंघात येऊ घातलेल्या १२ विधानसभा मतदारसंघाची सर्व सुत्रे आता मोहिते पाटील कुटुंबीयांकडे सोपविण्यात आल्याची माहिती समोर आलीय.
आगामी विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारांची निवड मोहिते पाटील यांच्याच सल्ल्यानेच होणार असे खासदार सुप्रिया सुळे यांनीच स्पष्ट केले आहे.
सोलापुर लोकसभा मतदारसंघात मोहोळ, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण,
पंढरपूर हे मतदारसंघ येतात, तर करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस, फटलण, माण हे विधानसभा मतदारसंघात माढा लोकसभा मतदारसंघात येतात.
आता दोन्ही लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे खासदार आहेत. या सर्व भागात शरद पवार, सुशील कुमार शिंदे, विजय मोहिते पाटील यांचं वर्चस्व राहिलं आहे. त्यामुळे हे तिन्ही नेत्यांनी सर्वाच्य सर्व मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाचा मागील ५० वर्षाचा इतिहास बघायचा झाल्यास शरद पवार आणि मोहिते पाटलांमध्ये अनेक संघर्ष झालेत. यात कधी सौहार्दपूर्ण दाट मैत्रीही दिसून आली तर कधी युद्धाचा उडालेला भटका दिसून आला.
यातच शरद पवार यांच्यासोबत असताना मोहिते-पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रमुख अडसर होता असे बोलले जायचे. त्यातूनच मोदी लाट असताना मागील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या
तोंडावर मोहिते पाटील कुटुंबीयांनी शरद पवार यांची साथ सोडून थेट भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तिथे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर सामावून घेण्यात आले होते.
नंतर काही दिवसांतच त्या पक्षातही मोहिते पाटील कुटुंबीयांची घुसमट होऊ घातली. मागील विधानसभा निवडणुकीत
भाजपने मोहिते पाटील यांना अजिबात विश्वासात न घेता त्यांच्या घरच्या माळशिरस राखीव जागेवर संघ परिवारातील राम सातपुते यांना शेवटच्या क्षणी आयात
करून त्यांच्या आमदारीकीची जबाबादरी सोपवली होती. त्यांचा या निवडणूकीत पराभव केला. आता जिल्ह्यातील सर्व सुत्रे मोहिते पाटलांच्या हाती दिल्यानं महाविकास आघाडीला मोठं बळ मिळण्याची शक्यता आहे.
0 Comments