सांगोला नगरपरिषदेच्या हद्दीत ५५ इमारती धोकादायक; घर मालकांना नोटीसा जुलै महिन्यात बचत गटांनी उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला :- पावसाळ्यात इमारती पडून अपघात टाळण्यासाठी नगरपरिषदेकडून धोकादायक इमारतीचे सर्वेक्षण करून ५५ इमारती धोकादायक असल्याचे
आढळून आले असून संबंधित घर मालकांना नोटीस देण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी दिली
सांगोला नगरपरिषदेकडून नळ पाण्याचे मीटर दुरुस्त करण्याची मोहीम सुरू केली असून त्या अंतर्गत शहरातील ११०६ मीटर बंद आढळून आले आहेत त्यांनी मीटर दुरुस्ती करून घ्यावी
अन्यथा दुपटीने पाणीपट्टी आकारावी लागेल असा इशारा देण्यात आला आहे. शहरातील विविध भागात ३५० पोल उभा करून ट्रीट लाईटची सोय करण्यात आली आहे,
सांगोला नगरपरिषद हद्दीमध्ये १५ हजार २६४ मालमत्ता धारक आहेत परंतु अनेकांची नोंदणी नगरपालिकेने केल्या नाहीत.
नगरपालिकेचे उत्पन्न वाढ होणे गरजेचे असल्याने ३१२ नवीन मालमत्तांची मोजणी नगर परिषदेकडून करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरात २०३ घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून ४८ घरकुल पूर्णत्वास येत आहेत.
बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी म्हणून जुलै महिन्यात उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे
या आर्थिक वर्षात बारा बचत गटांना सवलतीच्या वार्षिक ४ टक्के व्याजदराने ४१ लाख रुपये कर्ज वाटप
शहरातील विविध बँकेच्या सहकार्याने करण्यात आले आहे यापुढे शहरात जन्मलेल्या बाळाचे नाव नोंदणी नगरपालिकडून करीत
असताना एक मे २०२४ नंतर जन्म झालेल्या बालकाचे नाव त्यानंतर आईचे नाव वडिलांचे नाव व शेवटी आडनाव अशी नोंद होणार आहे
३१ मार्च २०२४ अखेर शहरात ६ हजार ३६४ नळ धारक कार्यरत आहेत तसेच आरोग्य विभागाकडून नालेसफाई करणे, तुंबलेल्या गटारी स्वच्छ करणे
साथिच्या रोगांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून
चिंचोली रोड पाण्याच्या टाकीच्या परिसरात १०० वृक्षाची लागवड करण्यात आली आहे प्लास्टिक बंदी जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत असून शहरात प्लास्टिक बंदी करण्यात आलेली आहे
जर कोणी वापर केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी दिला आहे
0 Comments