google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यात वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश मान्यताप्राप्त राष्ट्रीय कराटे पंच परीक्षेमध्ये निजेंद्र चौधरी व श्रावणी वाघमारे यांना A ग्रेड प्रमाणपत्र

Breaking News

सांगोल्यात वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश मान्यताप्राप्त राष्ट्रीय कराटे पंच परीक्षेमध्ये निजेंद्र चौधरी व श्रावणी वाघमारे यांना A ग्रेड प्रमाणपत्र

सांगोल्यात वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश मान्यताप्राप्त राष्ट्रीय कराटे पंच परीक्षेमध्ये


निजेंद्र चौधरी व श्रावणी वाघमारे यांना A ग्रेड प्रमाणपत्र

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : दि.6 व7 जुलै 2024 रोजी डि सी कुल खंडाळा येथे झालेल्या भारतातील एकमेव मान्यताप्राप्त संघटना कराटे इंडिया 

ऑर्गनायझेशन यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पंच परीक्षेमध्ये श्रावणी वाघमारे व निजेंद्र चौधरी यांनी A  ग्रेड प्रमाणपत्र मिळविले.

 या परीक्षा लेखी, प्रॅक्टिकल, थेरी अशाप्रकारे झाल्या. महाराष्ट्रातून 49 पंच सहभागी झाले होते. यापैकी दहा महिलांमधून एक श्रावणी वाघमारे आणि 39 पुरुषांमधून निजेन्द्र चौधरी यांनी यश संपादन केले. 

2023 रोजी निजेन्द्र चौधरी व श्रावणी वाघमारे यांनी B ग्रेड प्रमाणपत्र परीक्षा पास केली होती. यावर्षी A ग्रेड प्रमाणपत्र पास करणारे जिल्ह्यातील व ( सांगोला) मधील फक्त दोनच व्यक्ती आहेत.

 कराटे  वर्ल्ड कराटे फेडरेशन एशियन (WKF )एशियन कराटे फेडरेशन (AKF) साउथ इंडियन कराटे डो फेडरेशन

 (SAKF)कॉमनवेल्थ कराटे फेडरेशन  (CKF) WKF Recognised By इंटरनॅशनल ओलंपिक कमिटी यांची मान्यता असणारी भारतातील एकमेव मान्यताप्राप्त 

कराटे संघटना कराटे इंडिया ऑर्गनायझेशन आयोजित कराटे डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ( KAM) च्या पंच परीक्षेमध्ये निजेंद्र चौधरी व श्रावणी वाघमारे यांनी यश संपादन केले. 

 श्रावणी वाघमारे या सोलापूर जिल्ह्यातील A ग्रेड मान्यताप्राप्त एकमेव महिला पंच आहेत. श्रावणी वाघमारे या गेल्या पंधरा वर्ष कराटे क्षेत्रात कार्यरत आहेत

 तर निजेन्द्र चौधरी हे कराटे बारा वर्षापासून कार्यरत असून सर्वात कमी वयाचा A ग्रेड मान्यताप्राप्त पंच होण्याचा मान मिळविला. 

हे दोघेही  जिल्ह्यातील (सांगोल्या) एकमेव A ग्रेड रेफ्री व  सांगोल्यामधे कराटे खेळाची प्रथम सुरवात करणारे वाघमारे सरांकडे सराव करीत आहेत. 

त्यांना वेळोवेळी सुनील वाघमारे सरांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल सांगोल्यातील कराटे क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

श्रावणी वाघमारे व निजेन्द्र चौधरी यांना त्यांच्या पुढील वाटचालीबद्दल विविध क्षेत्रातुन शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments