खळबळजनक घटना.. नवरदेवाच्या खोलीतून १ लाखांचे दागिने पळविले; शिवणे येथील मंगल कार्यालयातील घटना
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला:- अज्ञात चोरट्याने नवरदेवाच्या खोलीत प्रवेश करुन १ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला
असल्याची घटना शिवणे ता. सांगोला येथील मंगल कार्यालयात घडली. चोरीची फिर्याद ज्ञानोबा जाधव रा. वाकी शिवणे यांनी दिली.
चोरट्यांनी ४० हजार रुपये किंमतीचे दोन तोळे वजनाचा सोन्याचा लक्ष्मीहार, ६० हजार रुपये किंमतीचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व रोख ३ हजार रुपये असा एकूण १ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.२९/०६/२०२४ रोजी सकाळी ११.४५ ते दुपारी ०३.३० वा. चे दरम्यान शिवणे येथील मंगल कार्यालयातील नवरदेवाच्या खोली मधील फिर्यादी ज्ञानोबा जाधव यांची मुलगी
शितल हिने कपड्याच्या बॅगेत प्लॉस्टीकच्या डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून घेऊन गेला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
अज्ञात चोरट्या विरूध्द सांगोला पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.पुढील तपास पोहेकॉ घोडसे हे करीत आहेत.
0 Comments