धक्कादायक…! अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तोंडात, डोळ्यात वाळू टाकून सामूहिक बलात्कार
अमरावती : एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली.
अल्पवयीन मुलीच्या तोंडात व डोळ्यात वाळू टाकून तिला चाकूने जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ही घटना २९ जून रोजी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
अक्षय प्रकाश खांडे (वय-२५), राजेश शंकर कोहळे (वय-३०), काल्या
उर्फ आकाश जगदीश पिल्लारे (वय-३०) व शिवाजी बंडू चौधरी (वय-२७) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलगी गावातीलच एका किराणा दुकानात काही
वस्तू खरेदी करण्यासाठी गेली होती. त्यावेळी शिवाजी चौधरी याने तुला आजीकडे सोडून देतो, अशी बतावणी करून तिला दुचाकीवर बसविले.
मात्र, तो तिला आजीकडे न नेता गावाहून थोड्या दूर अंतरावर एका निर्जनस्थळी घेऊन गेला.
त्या ठिकाणी आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
तिने नकार देण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपींनी तिच्या तोंडात आणि डोळ्यांत वाळू टाकली.
त्यानंतर तिला चाकूने जिवे मारण्याचा प्रयत्न करत तिचा गळा आवळला.
या घटनेने पीडित मुलगी प्रचंड घाबरली. मात्र, तिने अनेक दिवस वाच्यता केली नाही.
त्यानंतर स्वत:ला सावरत तिने चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी ४ आरोपींना अटक करण्यात आली
असून न्यायालयाने त्यांना मंगळवार ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे
0 Comments