google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात विनापरवाना खैरांची झाडे तोडल्याप्रकरणी तिघे अटकेत दुचाकीसह पिकअप अन् ३७० नग खैर लाकूड जप्त

Breaking News

सांगोला तालुक्यात विनापरवाना खैरांची झाडे तोडल्याप्रकरणी तिघे अटकेत दुचाकीसह पिकअप अन् ३७० नग खैर लाकूड जप्त

 सांगोला तालुक्यात विनापरवाना खैरांची झाडे तोडल्याप्रकरणी तिघे अटकेत दुचाकीसह पिकअप अन् ३७० नग खैर लाकूड जप्त


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला वनक्षेत्र हद्दीतील विनापरवाना खैराची झाडे तोडून वाहतूक केल्याप्रकरणी दत्तात्रय शिवाजी गोडसे रा. नराळवाडी, 

मारुती विलास गळवे व योगेश पांडुरंग ढेंबरे दोघेही रा. वाकी (शिवणे) ता. सांगोला या तियांना ताब्यात घेऊन 

त्यांच्याकडून ३७० नग खैर लाकूड नग, एक दुचाकीसह पिकअप वाहन जप्त केल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांनी सांगितले.

वनपरिक्षेत्र सांगोल्यामधील शिवणे, कटफळ, बागलवाडी तसेच शिरनांदगी (मंगळवेढा) येथील वन क्षेत्रातील खैर झाडे दत्तात्रय शिवाजी गोडसे रा. नराळवाडी, 

मारुती विलास गळवे व योगेश पांडुरंग ढेंबरे दोघेही रा. वाकी (शिवणे) ता. सांगोला यांनी १५ मे रोजी अवैध वृक्षतोड करून त्याची अवैध वाहतूक केली.

 यामध्ये शिवणे, शिरनांदगी व कटफळ येथील खैर लाकूडपैकी काही माल रत्नागिरी (विसापूर) येथील गुरुकृपा कात फॅक्टरी येथे विक्री केल्याचे तपासात सिध्द झाले आहे.

 दापोली येथे खैर माल ३०१ लाकूड नग जप्त करून वनपाल दापोली यांच्या ताब्यात दिला आहे तसेच बागलवाडी, ता. सांगोला येथे १९ नग खैर लाकूड वनक्षेत्रात मिळून आला

 तर कटफळ येथेही ५० नग खैर लाकूड जागेवर मिळून आले. वनअधिका-यांनी वनगुन्ह्यामध्ये अवैध वृक्षतोड करताना (एम एच ४५ एएफ- ९५३९) ही दुचाकी, (एमएच- ४५-एबी-०४४३ ) पिकअप वाहनासह खैर लाकुड माल जप्त करून

 वनपरिक्षेत्र कार्यालय सांगोला येथे जमा केला तसेच वरील आरोपी कडून झाडे कापण्यासाठी वापरलेले कटर जप्त केले याबाबत दि. २५ मे २४ रोजी प्रथम गुन्हा नोंद केला आहे. 

ही कारवाई धैर्यशील पाटील सोलापूर, बी. जी. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांनी केली.

Post a Comment

0 Comments