पूनम सावंत ठरल्या पैठणीच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (तालुका प्रतिनिधी): माणगंगा परिवार व सन मराठी प्रस्तुत आनंदी नव्या नात्यांची चांदी अर्थात होम
मिनिस्टर या स्पर्धेला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून या कार्यक्रमात पूनम सावंत पैठणीच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या माणगंगा परिवार आणि सन मराठी वाहिनीच्या पुढाकाराने २७ जून रोजी
शिवशक्ती मंगल कार्यालयात आनंदी नव्या नात्यांची चांदी अर्थात होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक नितीन (आबासाहेब) इंगोले, चेअरमन अर्चना ताई इंगोले, मराठी चित्रपट जत्रा फेम व सन मराठीचे कलाकार जयवंत भालेकर, वसांस्थेचे संचालक सचिन इंगोले,
विवेक घाडगे, विजय वाघमोडे, रोहिणी इंगोले, संस्थेच्या सभासद शुभांगी लिगाडे, अनुपमा गुळमिरे, जया वाघमोडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
या स्पर्धेत सुरेखा पवार, विद्या जाधव, पुनम माळी, शालन इंगोले, दिपाली कोळसे, वर्षा पारकर, वैशाली सलगर, निशा महानवर, स्वप्नाली केदार यांना बक्षिसे देण्यात आली.
होम मिनिस्टर स्पर्धे त प्रथम आलेल्या पूनम सावंत पैठणीच्या मानकरी ठरल्या. तर द्वितीय क्रमांक वर्षा बाबर तर तृतीय क्रमांक शोभा रणदिवे यांनी पटकावला.
या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शुभांगी लिगाडे, अनुपमा गुळमीरे, रोहिणी इंगोले, जया वाघमोडे, संजीवनी घाडगे, पुनम सावंत, मनीषा सुरवसे यांनी परिश्रम घेतले.
0 Comments