महत्वाची बातमी..दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या
वतीने मोफत मूत्ररोग निदान व शस्त्रक्रिया उपचार शिबिराचे आयोजन.
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला शहरातील दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगोला येथे मोफत मूत्ररोग निदान व शस्त्रक्रिया उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरास सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ञ डॉ चेतन शहा यांचे मार्फत मूत्ररोग, मुतखडा, प्रोटेस्टेट ग्रंथींची सूज, मूत्रशयाचे आजार,
किडनीचे आजार, किडनीतील खडे, मूत्रवाहिनी मधील खडे, मूत्राशयातील खडे व अन्य मूत्रविकार या सर्व आजारावर मोफत निदान करण्यात येणार आहे.
तसेच यामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून मूत्रविकार या संबंधातील तपासणी मोफत करणार येणार आहेत तरी या शिबिराचा
सांगोला तालुक्यातील सर्व गोरगरीब गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा आसे आव्हान डॉ शिवराज भोसले, डॉ प्रवीण पैलवान, डॉ अण्णासो लवटे, डॉ निरंजन केदार यांनी केले आहे.
यामध्ये केशरी, पिवळे आणि आता पांढरे शुभ्र रेशन कार्डधारकांनाही मिळणार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ.
0 Comments