मोठी बातमी..मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा प्रत्येकी ५० रुपयांचा खर्च दिपकआबा साळुंखे पाटील करणार असल्याचा निर्णय ; मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील
सांगोला : तालुका प्रतिनिधी( शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या
“मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा” सांगोला तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले आहे.
सांगोला शहर आणि तालुक्यातील सर्व सेतू कार्यालय आणि महा ई सेवा केंद्रात महिलांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी किंवा योजनेचा अर्ज भरण्यासाठी येणारा प्रत्येकी ५० रुपयांचा खर्च
दिपकआबा साळुंखे पाटील करणार असल्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्याकडून सांगोला तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणींना यानिमित्ताने आगळी वेगळी भेट देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत वय २१ ते ६५ दरम्यानच्या पात्र महिलांना प्रतिमाह १५०० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय कार्यालयातून या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे मोफत देण्याच्या सूचना
राज्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांनी दिल्या आहेत. मात्र खासगी सेतू कार्यालय आणि महा ई सेवा केंद्रात
आवश्यक कागदपत्रांसह या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी किंवा योजनेचा अर्ज भरण्यासाठी प्रत्येक फॉर्मसाठी प्रत्येकी ५० रुपये इतका शुल्क आकारण्यात येईल.
सांगोला तालुक्यातील सर्व सेतू चालक आणि महा ई सेवा केंद्राना याबाबत मा. आम दिपकआबा सूचना देणार आहेत. सांगोला तालुक्यातील सर्व महिलांचा खर्च स्वतः देणार असल्याचे आबांनी जाहीर केले आहे.
याबाबत महिलांना कोणतीही अडचण असल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांशी संपर्क करावा असेही यावेळी दिपकआबांनी स्पष्ट केले.
शासकीय पातळीवरून ही योजना मोफत राबविण्यात येत आहे. अद्याप या योजनेची नाव नोंदणी करणारे संकेतस्थळ सुरू झाले नाही.
शासकीय कर्मचारी या संकेतस्थळावर योजनेसाठी पात्र महिलांचा ऑनलाईन अर्ज भरणार आहेत.
मात्र शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या आणि शासकीय यंत्रणेतील मर्यादा लक्षात घेता शासनाने जाहीर केलेल्या मुदतीत सर्व पात्र महिलांचा ऑनलाईन अर्ज दाखल
करण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना स्थानिक सेतू कार्यालय किंवा महा ई सेवा केंद्राचीच मदत घ्यावी लागणार आहे. अशा परिस्थितीत खासगी सेतू कार्यालय किंवा
महा ई सेवा केंद्रात ग्रामीण भागातील महिलांना मोफत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सांगोला शहर आणि तालुक्यातील सर्व सेतू चालक आणि महा ई केंद्र चालकांना सूचना देण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक खासगी सेतू किंवा महा ई सेवा केंद्रात महिलांच्या ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी फक्त ५० रुपये इतके शुल्क आकारावे असे आदेश दिले आहेत.
सांगोला तालुक्यात खासगी सेतू आणि महा ई सेवा केंद्रात येणाऱ्या प्रत्येक महिलांचा प्रत्येकी ५० रुपयांचा खर्च दिपकआबा स्वतः देणार आहेत. सबंधित सेतू किंवा महा ई सेवा केंद्रात
माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचे नाव सांगून महिलांनी मोफत ऑनलाईन अर्ज दाखल करावा असे आवाहनही माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले आहे.
लाडक्या बहिणीला “भाऊराया” कडून मदतीचा हात
राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करून सबंध राज्यातील महिलांना राज्य सरकारने आधार दिला आहे. मात्र या योजनेसाठी पात्र महिलांना ऑनलाईन अर्ज कसा आणि कुठे दाखल करावा
याबाबत ग्रामीण भागातील महिलामध्ये प्रचंड संभ्रम आहे. खासगी सेतू आणि महा ई सेवा केंद्रात महिलांना या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी येणारा ५० रुपयांचा खर्च स्वतः देण्याचा निर्णय घेऊन
सांगोला तालुक्यातील लाडक्या बहिणीच्या “भाऊरायांनी” अर्थात माजी आमदार दिपकआबांनी मदतीचा हात दिल्याने या योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ होणार आहे.
0 Comments