सांगोला विद्यामंदिर, सांगोला ची १९७२ ची जुनी एस्. एस्. सी. च्या बॅच चे जवळपास पंचावन्न ते साठ
विद्यार्थी- विद्यार्थीनी ,काही सहकुटुंब बावन्न वर्षानंतर हाॅटेल जयनीला येथे एकत्र
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९३०३४८७८१२)
बावन्न वर्षांनी भेटले ! अन् सगळा बॅकलॉग काढला भरून!!
सांगोला ( वार्ताहर )- १ जुलै सोमवार रोजी सांगोला विद्यामंदिर, सांगोला ची १९७२ ची जुनी एस्. एस्. सी. च्या बॅच चे जवळपास पंचावन्न ते साठ
विद्यार्थी- विद्यार्थीनी ,काही सहकुटुंब बावन्न वर्षानंतर हाॅटेल जयनीला येथे एकत्र येऊन काल दिवसभर आपला स्नेह मेळावा अत्यंत उत्साहात साजरा केला.
सकाळी सर्व परगावाहून आलेले व स्थानिक विद्यामंदिर च्या प्रांगणात एकत्र जमले . संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व त्यांचे गुरुवर्य कै. आदरणीय बापूसाहेब झपके यांच्या
तैलचित्रास परगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सर्वांनी फुले वाहून आपल्या श्रद्धास्थानाला सुमनांजली वाहीली. त्यानंतर सर्व जण कार्यक्रम स्थळी मिळूनच गेले.
तेथे त्यांचे हाॅटेल व्यवस्थापनातर्फे स्वागत करण्यात आले. कै. बापू साहेबांच्या व सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, वेलकम ड्रिंक व स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
प्रास्ताविक प्रा.संजय क्षीरसागर यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी शहरातील चार पाच जणांनी अथक परिश्रम करून हा जो सुवर्णयोग घडवून आणला त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
व इतक्या लांब पल्ल्याच्या कालखंडानंतर हा योग घडवून आणण्यात कोरोना च्या काळातून वाचलेल्या आपल्या पीढीने , बॅचने एकदा एकत्र आले पाहिजे
हा इथल्या सहकाऱ्यांचा विचार कीती योग्य होता हे ' त्या ' कटू आठवणी व हे समोरील दृश्य पाहून मनाला पटल्याशिवाय रहात नाही. पुढे बोलताना प्रा. क्षीरसागर तत्कालीन शिक्षक जे हयात आहेत.
त्यांचा परत एकदा उर्वरित आयुष्यासाठी आपणाला आशीर्वाद घ्यायचा आहे व त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचं सांगत थोडक्यात कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.
प्रास्ताविकानंतर सर्व गुरुवर्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. व तद्नंतर आदरणीय प्रा. झपके सरांचा सन्मान करण्यात आला.
हा सर्व सन्मान सोहळा सर्व महिलांच्या हस्ते करण्यात आला हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य. सन्मान सोहळ्यानंतर आदरणीय झपके सरांनी उपस्थितांना संबोधित करताना स्नेह मेळावा,
त्याचे महत्व सांगताना एक प्रकारचे आपल्या मोबाईल ची बॅटरी रिचार्ज केल्यानंतर जो आनंद आपण अनुभवतो नेमका तोच या स्नेह मेळाव्यातून आपणाला मिळतो.
त्यांच्या बॅच च्या मेळाव्याचा अनुभव सांगून पुढे बोलतांना ते म्हणाले की , आज बावन्न वर्षानंतर तुम्ही या निमित्ताने भेटताय तो मिळणारा आनंद याचं वर्णन अद्वितीय असं असेल.
त्या काळातील आठवणी, काही खोडकर, काही खेळकर ,काही बौद्धिक तर काही शाळेविषयी, शिक्षकांविषयी असतील त्या संकोच न करता व्यक्त करा.
आपआपली मनं मोकळी करा असं सांगून त्यांनी त्यांच्या व या बॅच मधील अंतर व काही शिक्षकांचे गुण विशेष सांगतांना च तुम्ही ज्या संस्थेत शिकला त्या वेळी
कै. बापू साहेबांनी ज्या तत्त्वांनी संस्था, शिक्षक , विद्यार्थी , शिक्षक भरती या विषयी जे सूत्र पाळलं तेच आजही आपण कसोशीने पाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतोय.
आणि याच मुळे शिक्षक वर्ग प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यांचे अध्यापनाचे काम प्रामाणिक पणे करतात. त्याचेच फलित म्हणजे आज आपली संस्था, शाळा तालुक्यात नव्हे
तर जिल्ह्याच्या सिमा ओलांडून पर जिल्ह्यातही नावारूपास आली आहे. तुमच्या काळातील इमारत व आजची इमारत यात कीती फरक झाला आहे हे तुम्ही आज अनुभवलं आहेच.
तुम्ही आज या धावपळीच्या जीवनात सुद्धा वेळ काढून या संस्थेविषयी, शाळेविषयी, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इतक्या दूरवरून आलात या बद्दल
तुम्हाला मी धन्यवाद देतो असे नम्रपणे सांगून त्यानी उर्वरित आयुष्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. या सर्व शिक्षकांचा सन्मान केल्याबद्दल सर्वाचे आभार मानले.
त्या नंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपापला परिचय करून देतांना काहीनी शिक्षकांच्या विषयी, तर काहींनी शालेय जीवनातील ,काहींनी शाळेविषयी आठवणी सांगत
असतांना आज आम्ही जे काही आहोत ते केवळ या शाळेमुळेच व येथील शिक्षकांमुळेच अशी कृतज्ञतापूर्वक भावना व्यक्त केली.
स्नेह भोजनानंतर सर्वांनाच हवाहवासा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाला. काही कविता, विनोद करतानाच
या सत्तरीच्या वयात सुद्धा जोडीने नृत्य सादर केलेले पाहून व पुरूष कलाकाराने लावणी वर नृत्य केलेले पाहून या कलेशी कसलाही संबंध
नसलेल्यानीच आग्रह करून समूह नृत्याचा आग्रह करीत सैराट च्या गाण्यावर सर्वानीच ठेका धरून कार्यक्रमाचा क्लायमॅक्स गाठला. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता केली.
0 Comments