शासनाने दुधाची दरवाढ करावी या मागणीसाठी सांगोला तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु.
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
शासनाने दुधाची दरवाढ करावी, या मागणीसाठी विकास साळुंखे व गायगव्हाण येथील शेतकऱ्यांचे सांगोला तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु आहे
सांगोला तालुक्यातील शेतकरी यांच्याकडे सध्या दुभत्या गाई म्हशी आहेत तसेच परंतु सध्या शासनाने दुधाची दरवाढ केली.
नसल्यामुळे आणि जनावरांची खाद्य पेड, भुसा, भरडा, वैरण यांच्या किमती दुप्पट झाल्यामुळे चालू दरामध्ये दूध परवडत नाही कारण जे खाद्य जनावरांना देतो
त्याचे सुद्धा पैसे निघत नाहीत मागील एक वर्षापासून दुधाच्या दरामध्ये दहा रुपयांनी घट झाल्यामुळे शेतकरी फार मोठ्या
आर्थिक संकटात सापडलेला आहे त्याचबरोबर जनावरांचे मार्केट सुद्धा परवडत नसल्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय करावा की नको असा प्रश्न शेतकऱ्यांना सध्या भेडसावत आहे.
तरी शासनाने त्वरित दूध दरवाढ करावी या मागणीसह इतर मागण्यासाठी तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे
यावेळी नितीन शिंदे, सौरभ शिंदे, ऋषिकेश साठे, सचिन यादव, भूषण बागल, सुरज बागल, खंडू हिप्परकर, बसवेश्वर काळेल, विजय शेळके,
श्रीकांत साळुंखे, यशवंत साळुंखे, आर पी आय चे सांगोला तालुका अध्यक्ष खंडू सातपुते, बी एस पी तालुका अध्यक्ष कालिदास कसबे, एन डी एम जे चे प्रशांत चंदनशिवे,
बहुजन समाज क्रांती संघटनेचे संस्थापक रविंद्र कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा प्रवक्ते ऍड महादेव कांबळे,
नागेश जोशी, नवल गाडे, परमेश्वर साळुंखे सुशांत वाघमारे,सचिन यादव इत्यादी ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित हो
0 Comments