google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महत्वाची बातमी! टेंभूर्णी ते अकलुज व अकलुज ते टेंभूणी येथील वाहतुक मार्गात बदल

Breaking News

महत्वाची बातमी! टेंभूर्णी ते अकलुज व अकलुज ते टेंभूणी येथील वाहतुक मार्गात बदल

महत्वाची बातमी! टेंभूर्णी ते अकलुज व अकलुज ते टेंभूणी येथील  वाहतुक मार्गात बदल


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सोलापूर-   संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग इंदापूर ते तोंडले या महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. 

पालखी सोहळयापुर्वी नवजीवन हॉस्पीटल अकलाई कॉर्नरजवळ जंक्शन करण्याचे काम सुरू आहे.

 सदरचे काम पालखी सोहळयापुर्वी पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सूचना दिल्या असून, 

 सदर काम करताना  टेंभूर्णी ते अकलुज व अकलुज ते टेंभूणी या रहदारी मुळे अडथळा होत

 असल्याने दिनांक 25 जून 2024 रोजीचे 04 वाजे पासुन ते दिनांक 26 जून 2024 रोजीचे 08.00 वाजेपर्यंत टेंभूर्णी ते अकलुज व अकलुज ते टेंभूणी येथील  वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे.

सोलापूर ग्रामीण महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 च्या कलम 33 (1) (ब) अन्वये प्राप्त शक्तीच्या अधारे जिल्हा पोलीस अधिक्ष शिरीष सरदेशपांडे यांनी याबाबतचे आदेश पारीत केले आहेत. 

दिनांक 25 जनू 2024 रोजी 04.00  ते 26 जून 2024 रोजी 08.00 वाजेपर्यंत अकलूज ते टेंभूर्णी व टेंभूर्णी ते अकलूज

 या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतुक बाहयवळणाने वळविणेकरीता पर्यायी मार्गाचा वापर करतील.

अकलुज मधील कर्मवीर चौक (मसुदमळा ) या बाह्यवळण ठिकाणाहून अकलूज कडून टेंभूर्णीकडे जाणारी वाहने

 अकलुज महाळुंग 25 / 04, लवंग मार्गे टेंभूणी कडे जातील. तर माळीनगर कडे जाणारी स्थानिक वाहने महाळुंग रस्ता, 

पांढरे वस्ती मार्गे माळीनगरकडे जातील. तर 25 /4 चौक, लवंग (महाळुंग कडे जाणारा चौक) बाह्यवळण ठिकाणाहून

  टेभुर्णीहून अकलूज कडे येणारी वाहने 25 /4 चौक, लवंग, बाबरी पुल मार्गे अकलुज शहरात येतील. 

तसेच माळीनगर ते अकलुज व अकलुज ते माळीनगर अशी स्थानिक वाहतुक माळीनगर, पांढरे वस्ती मार्गे अकलुजकडे येतील व अकलूज कडून माळीनगर कडे जातील.

सदरचा आदेशाचा  अंमल हा दि.25 जून 2024 सायं.04.00 वा.पासून ते दि.26 जून 2024 रात्री 08.00 वाजे.पर्यंत लागू राहिल. असेही आदेशात नमूद केले आहे.

Post a Comment

0 Comments