ब्रेकिंग! गिरीश महाजन महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री?
लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर आता नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा ९ जून रोजी पंतप्रधानपदाची
शपथ घेणार आहेत. यावेळी लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर
आज राजधानी दिल्लीत संसदीय दलाची संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक पार पडली आणि त्यात सर्वांनी मोदींच्या नावाचा प्रस्ताव मंजूर केला. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनाम्याच्या तयारीत आहेत.
फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये, यासाठी भाजपच्या दिग्गज नेत्यांनी प्रचंड प्रयत्न केले. पण फडणवीस राजीनाम्यावर ठाम आहेत. फडणवीस यांनी राजीनामा दिला
तर महाराष्ट्रात भाजपचा उपमुख्यमंत्री कोण असेल? असा मोठा प्रश्न आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फडणवीस यांनी राजीनामा दिला तर भाजपचे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध
असलेले नेते गिरीश महाजन यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. कारण सध्याच्या घडीला महाराष्ट्रात भाजपमध्ये महाजन यांचे नाव आघाडीवर आहे.
महाजन हे सध्या राज्यातील भाजपचे दोन नंबरचे नेते आहेत. त्यांची पक्षाचे संकटमोचक नेते म्हणून ख्याती आहे. याशिवाय ते फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते आहेत.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर फडणवीस यांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे आपल्याला
पक्ष संघटनेसाठी उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीपासून मुक्त करावं, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या याच मागणीसाठी फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत.
0 Comments