google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायत निधीचा गैरवापर; कमलापूरच्या ग्रामसेविका निलंबित

Breaking News

खळबळजनक..सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायत निधीचा गैरवापर; कमलापूरच्या ग्रामसेविका निलंबित

खळबळजनक..सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायत निधीचा गैरवापर; कमलापूरच्या ग्रामसेविका निलंबित 


शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे 

सांगोला : ग्रामपंचायत तपासणी कामी असहकार्य करणे, वारंवार लेखी व तोंडी सूचित करूनही दप्तरात त्रुटी ठेवणे,

 ग्रामपंचायत निधीचा परस्पर गैरवापर करण्यासह आदी कारणांचा ठपका ठेवून गटविकास अधिकारी आनंदराव लोकरे यांनी कमलापूर (ता. सांगोला)

 ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका एस. व्ही. गवंड यांना सोमवार २४ जून रोजी शासकीय सेवेतून निलंबित केल्याचे सांगोला पंचायत समिती सूत्रांकडून सांगितले.

त्या कमलापूर ग्रामपंचायत येथे शासकीय सेवेत ग्रामसेविका म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान त्यांच्याविषयी तक्रार अर्जाच्या

 अनुषंगाने लेखी म्हणणे सादर करण्याबाबत सूचित केले असताना त्यांनी आजअखेर त्यांचे म्हणणे सादर केले नाही. 

वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करणे, खुलासा वेळेत व समाधानकारक न सादर करणे, सचिव म्हणून कर्तव्यात कसूर करणे

 तसेच सजामध्ये नियमित व पूर्ण वेळ उपस्थित राहून कामकाज न करणे, ग्रामपंचायत सरपंच, पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्यासमवेत गैरवर्तन या गंभीर बाबी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा

 (शिस्त व अपिल) नियम १९६४ मधील नियम ३ नुसार, शिस्तभंग विषयक कारवाईस वरील बाबीस अनुसरून ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून आपण आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केल्याची पात्र आहेत

 ही बाब निदर्शनास आलेली आहे. अनियमित कामकाज व गैरवर्तनाबाबत शिस्तभंग विषयक कारवाईस पात्र ठरत असल्याने निलंबित केल्याचे आदेशात नमूद केले आहे.

Post a Comment

0 Comments