google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला येथील कोपटे वस्ती येथे वाळू घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने पोलिसाच्या वाहनास दिली जोराची धडक, कॉन्स्टेबल जखमी; एकावर गुन्हा दाखल

Breaking News

सांगोला येथील कोपटे वस्ती येथे वाळू घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने पोलिसाच्या वाहनास दिली जोराची धडक, कॉन्स्टेबल जखमी; एकावर गुन्हा दाखल

सांगोला येथील कोपटे वस्ती येथे  वाळू घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने पोलिसाच्या वाहनास दिली


जोराची धडक, कॉन्स्टेबल जखमी; एकावर गुन्हा दाखल

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

नदी पात्रातून अवैद्यरीत्या वाळू उपसा करून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने 

पोलिसांच्या सरकारी वाहनास उजव्या बाजूस जोराची धडक दिली. या अपघातात पोलिस कॉन्स्टेबलच्या उजव्या हाताला गंभीर मार लागून जखमी झाला आहे.

ही घटना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास सांगोला ते कोपटेवस्ती जुन्या लक्ष्मीदहिवडी जाणाऱ्या रोडवर घडली.

याबाबत पोलिस कॉन्स्टेबल तेजस मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन महादेव नायकुडे (रा. जवळा, ता. सांगोला)

 याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणून सरकारी वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

सांगोला येथील कोपटे वस्ती येथे माण नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा चालू असल्याचा डायल ११२ वरून कॉल आल्याने पोलिस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे, पोलिस कॉन्स्टेबल रवी साबळे,

चालक पोलिस कॉन्स्टेबल तेजस मोरे असे मिळून मंगळवारी रात्री १० च्या 

सुमारास एम एच-१३-बीक्यू-०१५८ या सरकारी वाहनाने जात होते. ट्रॅक्टरने पोलिसांच्या वाहनाच्या चाकाला जोराची धडक दिली.

त्यामध्ये चालक पोलिस कॉन्स्टेबल तेजस मोरे यांच्या हाताला दुखापत झाली. सरकारी वाहनाच्या उजव्या बाजूची हेडलाईट, टायर रॉड, समोरील बंपर तुटून फुटून अंदाजे सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान केले.

यावेळी पोलिसांनी चार हजार रुपयांच्या एक ब्रास वाळूसह ५ लाखांचा ट्रॅक्टर जप्त करून ताब्यात घेतला.

कारवाई दरम्यान पोलिसांनी त्यास आम्ही पोलिस असल्याचे सांगूनही त्याने पोलिसांसमवेत हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments