google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला क्रीडा संकुलासाठी तीन कोटीचा निधी मंजूर - आमदार शहाजीबापू पाटील आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करण्याचा मानस, ५२ कोटींचे अंदाजपत्रक सादर

Breaking News

सांगोला क्रीडा संकुलासाठी तीन कोटीचा निधी मंजूर - आमदार शहाजीबापू पाटील आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करण्याचा मानस, ५२ कोटींचे अंदाजपत्रक सादर

सांगोला क्रीडा संकुलासाठी तीन कोटीचा निधी मंजूर -


आमदार शहाजीबापू पाटील

आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करण्याचा मानस, ५२ कोटींचे अंदाजपत्रक सादर

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (तालुका प्रतिनिधी): सांगोल्यातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावे यासाठी खेळाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सांगोला येथील

 क्रीडा संकुलासाठी ३ कोटी रुपयांच्या निधीला शासनाने मंजुरी दिली आहे. क्रीडा संकुल समितीने अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ५२ कोटी ९४ लाख ९५ हजार रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले आहे.

 यापूर्वी या क्रीडा संकुलासाठी एक कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. तसेच नव्याने मंजुर झालेल्या ३ कोटींच्या निधीचा वापर हा तालुका क्रीडा संकुलात टेनिस कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट,

 व्हॉलीबॉल, खो-खो मैदान, कबड्डी, फूटबॉल मैदान, वॉकिंग ट्रॅक, मुलामुलीचे वसतीगृह (तळमजला) अशा सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

     सांगोला शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभा करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. 

सांगोला येथील दहा एकर जागेत असलेल्या क्रीडा संकुलात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडा संकुल समितीने ५२ कोटी ९४ लाख ९५ हजार रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले आहे.

 सदर संकुलास यापूर्वी १ कोटी ९ लाख ५४ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. क्रीडा संकुल समितीस वाढीव शासन अनुदान मर्यादा विचारात घेऊन यापूर्वी

 झालेला खर्च एक कोटी व सुधारीत ३ कोटी रुपये असे मिळून चार कोटी रुपयांच्या अंदाजपत्रक आराखड्यास सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 

या निधीतून टेनिस कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, व्हॉलीबॉल, खो-खो मैदान, कबड्डी, फूटबॉल मैदान, वॉकिंग ट्रॅक, मुलामुलीचे वसतीगृह (तळमजला) व इतर खर्च याचा समावेश आहे.

       तसेच सदर क्रीडा संकुलाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये ४९ कोटी ९४ लाख ९५ हजार रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले

 असून यामध्ये ४०० मी धावणे ट्रॅक अद्यावतीकरण, इनडोअर हॉल (४०.८१ मी x २४.९० मी. दुमजली, वुडन फ्लोरिंग, एअर कंडीशन, ऑकेस्टिक), गेस्ट

हाऊस (२ मजली, डायनिग व किचन हॉलसह), जलतरण तलाव, डायव्हिंग पूल, डायव्हिंग बोर्डस व जिना, बॅलेसिंग टँक, फ्लिट्रॅरेशन प्लांट, 

जलतरण साहित्य, प्रेक्षक गॅलरी २० दुकान गाळासह, स्वच्छतागृह), मुले-मुली वसतिगृह (प्रत्येकी ३ मजली, डायनिग व किचन हॉल सह), कर्मचारी निवासस्थान, संरक्षक भिंत, 

प्रवेशद्वार, अंतर्गत रस्ते, पाण्याची व्यवस्था, अंतर व बाह्य विद्युतव्यवस्था, सोलर ग्रीड व्यवस्था, पथदिवे, लँडस्केपिंग, पाणी साठवण व्यवस्था (ओव्हर हेड व अंडर ग्राऊड), लिफ्ट व्यवस्था याचा समावेश आहे.

 सदर क्रीडा संकुलातील वाढीव बाबींचे प्रस्तावित्त अंदाजपत्रक ४९ कोटी ९४ लाख ९५ हजार रुपयांचे असल्याने हा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

चौकट

क्रीडा संकुलाच्या माध्यमातून सांगोला सारख्या ग्रामीण भागातून राष्ट्रीय व आतरंराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी क्रीडा 

संकुलमध्ये अधिकाधिक दर्जेदार सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याची क्षमता या तालुक्यात आहे.

 त्यासाठी उत्तम दर्जाच्या सोयीसुविधा खेळाडूंना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या सुविधा निर्माण करण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील. - आमदार शहाजीबापू पाटील

Post a Comment

0 Comments