google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील कोळे येथील रुद्र पशुपती मठाचे मठाधिपती कोळेकर महाराज यांचे निधन

Breaking News

सांगोला तालुक्यातील कोळे येथील रुद्र पशुपती मठाचे मठाधिपती कोळेकर महाराज यांचे निधन

सांगोला तालुक्यातील कोळे येथील रुद्र पशुपती मठाचे मठाधिपती कोळेकर महाराज यांचे निधन


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

कोळे (ता. सांगोला) येथील रुद्र पशुपती मठाचे ३० वे मठाधिपती कोळेकर महाराज यांचे वयाचे ६१ व्या वर्षी 

अल्प आजाराने कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील भक्तामध्ये शोककळा पसरली आहे

कोळेकर महाराज यांचे मूळ गाव निमसोड (जि. सातारा) येथे असून त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९६२ ( वसंतपंचमी) या दिवशी माहुली येथे झाला. 

१९७३ मध्ये वयाच्या अकराव्या वर्षी त्यांचा निमसोड येथे पट्टाभिषेक करण्यात आला. काशी जगद्गुरु चंद्रशेखर महाराज यांचे मार्गदर्शनाखाली जंगमवाडी मठात 

धार्मिक व अध्यात्मिक शिक्षण पूर्ण केले. तदनंतर शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी कोळेकर मठाचे माध्यमातून धर्म जागृतीचे कार्य अखंडपणे केले. 

त्यांचे गुरुतत्त्वाखाली तेरा ठिकाणी अग्नी होम, निमसोड येथे दोन वेळा कोटी बिल्वार्चन, मुंबई व अन्य ठिकाणी परम रहस्य पारायण शिवदिक्षाविधी

 तसेच कोळे ते शिखर शिंगणापूर पायी दिंडी असे उपक्रम राबवून धर्मप्रसार केला. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना ३० मे रोजी मिरज येथील सेवासदन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 त्यानंतर त्यांना कोल्हापूर येथील डायमंड रुग्णालयात हालवण्यात आले होते. आज सकाळी ११ वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Post a Comment

0 Comments