google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक.. सांगोला -अप्रुका नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात आलेगावचा तरुण वाहून गेल्याचा संशय

Breaking News

धक्कादायक.. सांगोला -अप्रुका नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात आलेगावचा तरुण वाहून गेल्याचा संशय

धक्कादायक.. सांगोला -अप्रुका नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात आलेगावचा तरुण वाहून गेल्याचा संशय


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला:- अप्रुका नदीला आलेल्या पुराच्या पाण्यातून जाताना आलेगाव ता सांगोला येथील तानाजी भगवान दिवसे हा ३७ वर्षीय तरुण घराकडे परतलाच नाही. 

त्यामुळे तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याच्या संशयावरून नातेवाईकांनी गेली दोन दिवस त्याचा अप्रुका नदीच्या पाण्यात

 शोध घेऊनही तो सापडला नाही.याबाबत, तानाजीची आई धोंडाबाई भगवान दिवसे (रा. आलेगाव) यांनी पोलिसात मुलगा हरविल्याबाबत तक्रार दिली आहे.

आलेगाव (दिवसेवस्ती) ता. सांगोला येथील तानाजी भगवान दिवसे हा ३७ वर्षीय तरुण बुधवारी (दि.११) रात्री ९ च्या सुमारास

 आलेगाव ते दिवसेवस्ती घराकडे निघाला होता दरम्यान त्यादिवशी मृगाच्या मुसळधार पावसामुळे दिवसे वस्तीकडे जाणाऱ्या रोडवरील 

अप्रुका नदीला पाणी आल्यामुळे गावातील लोकांनी त्याला नदीला पाणी आले आहे. तू पाण्यातून जाण्याचे धाडस करू नकोस म्हणून ग्रामस्थांनी रोखले होते तरीही तो अंधारात तसाच पाण्यातून पुढे निघाला होता.

मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तो घराकडे परतलाच नाही. त्यामुळे नातेवाईकांनी त्याची चौकशी सुरू केली

 असता ग्रामस्थांनी रात्री घडला प्रकार सांगितल्याने तो पाण्यात वाहून गेला की काय असा संशय व्यक्त केला. दरम्यान, नातेवाईकांनी गेली दोन दिवस

 अप्रुका नदी पात्राच्या दुतर्फा तानाजीचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही म्हणून पोलीस पाटील दिलीप पाटील यांनी नातेवाईकांना तानाजी हरविल्याबाबत पोलिसांत तक्रार देण्यास सांगितले होते.

Post a Comment

0 Comments